• मेष:-
    जोडीदाराशी मतभेद संभवतात. अतिविचार करू नये. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीवर जोर द्यावा लागेल. परिस्थितीला नावे ठेवू नका.
  • वृषभ:-
    चौकसपणे विचार करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. घरात काही किरकोळ बदल कराल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसेल.
  • मिथुन:-
    घरातील वातावरणात रमून जाल. किरकोळ बदल स्वीकारावेत. जवळचा प्रवास घडेल. नातेवाईक भेटतील. घरात कर्तेपणाचा मान मिळवाल.
  • कर्क:-
    कामात सुसूत्रता ठेवावी. मनाची संवेदनशीलता दाखवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विविध विषयांवर बोलू शकाल. नवीन माहिती गोळा कराल.
  • सिंह:-
    आर्थिक गुंतवणूक कराल. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. खाण्या-पिण्याची आवड पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. प्रेमळपणाने सर्वांना आपलेसे कराल.
  • कन्या:-
    धडपड करून कामे मिळवाल. लहरिपणाने वागू नये. जबाबदारी घेतांना विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल. उत्तम परीक्षण कराल.
  • तूळ:-
    श्रम व दगदग वाढेल. कामाचा जोम व उत्साह वाढेल. आर्थिक बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. आपली मते परखडपणे मांडाल. कमिशनच्या कामातून फायदा कमवाल.
  • वृश्चिक:-
    कर्ज प्रकरणात सावध राहावे. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. संयम बाळगावा लागेल. घरात मंगल कार्ये ठरतील. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल.
  • धनु:-
    विचारांची दिशा बदलून पहावी. आध्यात्मिक बळ वाढवावे. शांततेचे धोरण स्वीकाराल. आवडीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. गायन कळेल बळ मिळेल.
  • मकर:-
    सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वागण्यात स्वच्छंदीपणा येईल. दिवस इच्छेनुसार व्यतीत कराल. सामाजिक कार्यात हातभार लावाल. धार्मिक ग्रंथाचे वाचन करायला घ्याल.
  • कुंभ:-
    वैचारिक शांतता जपावी. अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्सच्या कामात लक्ष घालाल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. वरिष्ठांच्या होकारात होकार मिसळावा लागेल.
  • मीन:-
    कामाच्या ठिकाणी काही चांगले बदल घडून येतील. गैरसमजापासून दूर राहावे. जोडीदाराची बाजू समजून घ्याल. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर