मेष

नोकरीमध्ये बदलीसाठी, बढतीसाठी, पगारवाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस. शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करावे. प्रवास टाळावा, वाहने वेगाने चालवू नये.
आजचा रंग – तपकिरी

वृषभ

आज प्रवास जपून करावेत. वेगावर नियंत्रण ठेवावे. आजचा दिवस साधारण आहे. महत्त्वाचे कुठलेही निर्णय घेऊ नये. वादविवाद टाळावेत. शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे.
आजचा रंग- नारंगी

मिथुन

भविष्यातील नियोजनांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. चंद्राचे तुळ राशीतले भ्रमण दिवसभर राहणार आहे. त्यामुळे सकाळपासूनच उत्साह चैतन्यमय जाणवेल. त्यांचा पुरेपर फायदा घ्यावा. आज शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – नारंगी

कर्क

चंद्राचे तुळ राशीतील भ्रमण कर्क राशीतील व्यक्तींना फायदेशीर होऊ शकते. अनेक आर्थिक योजना मार्गस्थ होऊ शकता. वाहन खरेदी, नवीन गाडीचे बुकिंग, घराचे बुकिंग आज होऊ शकते. त्या दृष्टीने जरुर प्रयत्न करावेत. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- तपकिरी

सिंह

आज लहान किंवा मोठ्या प्रवासाचे योग आहेत. प्रवास जपून करावेत. वाहनाची योग्य काळजी घ्यावी. जुन्या मित्र आप्तेष्टांच्या भेटीगाठीचे योग आहेत. आनंदी दिवस जाईल. व्यावसायिकांच्या नवीन भेटी होतील. शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग- पिवळा

कन्या

चंद्राचे भ्रमण तुळ राशीतून असणार आहे. आज जुने मित्र, जुने ओळखीचे भेटण्याचे योग आहेत. छोट्या मोठ्या प्रवासाचे योग आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे.
आजचा रंग – तपकिरी

तुळ

आज साडेसातीच्या ताणापासून थोडी उसंत मिळेल. कुटुंब, मित्र परिवारात वेळ घालवाल. आर्थिक नियोजनही करावे. भाग्यकारक दिवस आहे. अभ्यंग स्नान करावे. शनी-मारुती दर्शन घ्यावे.
आजचा रंग तपकिरी

वृश्चिक

आज चंद्राचे तुळ राशीतले भ्रमण प्रवासाचे योग देणारे आहे. प्रवासाची दगदग जाणवेल पण कुटुंबासोबत वेळ घालवाल. शनी मंत्राचा जप करणे. वाहने जपून चालवणे.
आजचा रंग – निळा

धनु

आज धनु राशीला प्रवास संभावतो. घरातील एखाद्या कार्यासाठी, मित्रासाठी, प्रवास करावा लागेल. शनी मंदिरात तीळाच्या तेलाचा दिवा लावावा. प्रकृतीची काळजी घेणे.
आजचा रंग – पिवळा

मकर

आज सकाळपासून चंद्राचे भ्रमण तुळ राशीत राहणार आहे. व्यापार व्यवसायासाठी उत्तम. मुलांचे प्रश्न सोडवता येतील. गृहिणींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास होतील, दगदग जाणवेल. परदेशी प्रवासाचे योग आहेत. आनंदी दिवस आहे.
आजचा रंग – पिंगट

कुंभ

आज सकाळपासून चंद्राचे भ्रमण तुळ राशीत राहणार आहे. व्यवसायाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक चिंता कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. वैवाहिक सौख्याचा दिवस आहे. मारुतीला पाच दिवे लावावे
आजचा रंग – तपकिरी

मीन

प्रवासात काळजी घ्या. घरातील समस्यांना वेळ द्यावा. जड अन्न टाळावे. आहारावर नियंत्रण ठेवावे. शनी मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader