मेष

मारूती मंदिरामध्ये शेंदूर अर्पण करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेची आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठ्या आर्थिक गुंतवणूकीचे निर्णय घेत अ‍सताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

gajkesari rajyog being formed on 06 febuary 2025 these zodiac sign will be lucky
महाशिवरात्रीच्या आधी निर्माण होतोय गजकेसरी राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ketu mangal yuti 2025 today horoscope
Ketu Mangal Yuti 2025 : जूनमध्ये खुलणार ‘या’ राशींचे भाग्य; केतू-मंगळाच्या युतीने मिळणार भरपूर पैसा अन् संपत्ती
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

वृषभ

मारूती मंदिरात स्तोत्र म्हणून दिवसाची सुरूवात करावी. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडीटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग – राखाडी

मिथुन

ॐ देवोभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. कुटूंबाशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळीच्या प्रकृतीची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक, फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ विश्वोभ्यो देवोभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल, परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –लाल

सिंह

शनि, मारूती मंदिरात तेल व शेंदूर अर्पण करावे. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग -लाल

कन्या

शनि, मारूती मंदिरात दर्शन घ्यावे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग –गुलाबी

तुळ

कालभैरवाचे दर्शन घ्यावे. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीची खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता घ्यावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग -क्रीम

वृश्चिक

मारूतीचे दर्शन घ्यावे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग –निळा

धनु

मारूतीला शेंदूर अर्पण करावे. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अ‍नुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –पांढरा

मकर

मारूतीचे दर्शन घ्यावे. परदेशांशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल.
आजचा रंग –नारंगी

कुंभ

हनुमान चालिसाचे पाठ करावे. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठे आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग- नारंगी

मीन

हनुमान चालिसाचे पाठ करावे. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडीटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader