- मेष:-
बौद्धिक दृष्टीकोनातुन विचार कराल. इतरांना मदत करण्याची तुमची भूमिका कौतुकास्पद ठरेल. उपासनेला अधिक बळ मिळेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. हातातील कामात यश येईल. - वृषभ:-
कंजूसपणा दाखवू नये. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. मतभेदाला मनात थारा देऊ नये. काही इच्छा पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. - मिथुन:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. आध्यात्मिक दृष्टीने दिवस चांगला जाईल. आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक अपेक्षा पूर्ण होईल. - कर्क:-
सांपत्तिक दर्जा सुधारेल. अपचनाचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याची हयगय करू नये. नातेवाईकांची मदत मिळेल. जुने मित्र भेटतील. - सिंह:-
मुलांशी सुसंवाद साधाल. बौद्धिक छंद जोपासता येईल. योग्य तर्क वापराल. बक्षिसास पात्र व्हाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. - कन्या:-
नवीन वाहन खरेदीसाठी प्रयत्न करा. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. - तूळ:-
सर्वांशी प्रेमळपणे वागाल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. कामात अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. हातून चांगले लिखाण होईल. गायन कलेत प्रगती करता येईल. - वृश्चिक:-
जुनी कामे सामोरी येतील. आर्थिक प्रश्न सुटतील. वारसाहक्काची कामे निघतील. व्यापरिवर्गाला चांगला धनलाभ होईल. कामातून अपेक्षित धनलाभ होईल. - धनु:-
तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. कामाची योग्य पद्धत निवडाल. सर्वांशी खिलाडूवृत्तीने वागाल. स्वतःचा मान राखाल. हातात नवीन अधिकार येतील. - मकर:-
पारमार्थिक उन्नती साधता येईल. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. काही गोष्टींपासून दूर रहाल. सामाजिक सेवेत असणाऱ्यांना प्रगती करता येईल. क्षमशीलतेने वागाल. - कुंभ:-
सुसंस्कृत मित्रांच्यात वावराल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कामात स्त्रीवर्गाचा हातभार लागेल. - मीन:-
व्यावसायिक चिंता दूर होईल. तुमचा मानसन्मान वाढीस लागेल. कामात वडिलांचे सहकार्य घेता येईल. पोटाचा त्रास उदभवू शकतो. गैरसमज मनात धरून ठेवू नयेत.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 30-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 30 november 2019 aau