मेष:- गैरसमज फार ताणू नयेत. लहानांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा. काही गोष्टींना विरोध होवू शकतो. उत्साहाच्या भरात सारासार विचाराला बाजूस सारु नये. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी. वृषभ:- स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे. काही वेळेस शांत राहणे उत्तम ठरेल. कौटुंबिक शांततेला महत्व द्यावे. काही गोष्टींची ओढाताण जाणवेल. मिथुन:- पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांची मदत घ्याल. वादात अडकू नये. साहसाने कामे हाती घ्याल. प्रवासात काळजी घ्यावी. कर्क:- कामातून चांगली प्राप्ती होईल. काही कामात अधिक कष्ट पडतील. आवडी-निवडी वर अधिक भर द्याल. कौटुंबिक प्रश्न भेडसावतील. खर्चाचे योग्य नियोजन कराल. सिंह:- मानसिक स्थैर्य जपावे. चिडचिड टाळावी लागेल. पित्त विकार जाणवतील. व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. श्रमामुळे थकवा जाणवेल. कन्या:- जनक्षोभापासून दूर राहावे. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. स्त्रीवर्गापासून दूर राहावे. चुकीच्या कामात हात घालू नये. वाद-विवादापासून लांब रहा. तुळ:- नवीन मित्र जोडाल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन गोष्टी शिकून घ्या. ओळखीचा सुयोग्य फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. वृश्चिक:- कामाच्यावेळी इतर विचार बाजूला सारावेत. कलेतून आर्थिक फायदा संभवतो. धार्मिक कामात मदत कराल. कामातील बदलाकडे सकारात्मकतेने पाहावे. दगदग जाणवेल. धनु:- वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. प्रवासात सतर्क राहावे. मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेवू नयेत. वडीलधा-यांचा मान राखावा. मदतीला धावून जाल. मकर:- सद्य स्थितीचा विचार करावा. तब्येतीची हेळसांड करू नका. तुमच्यातील समजूतदारपणा दाखवावा. क्षुल्लक गोष्टींवर अडून राहू नका. चिंता करत बसू नये. कुंभ:- भागीदारीत प्रगतीला वाव आहे. तुमचा जनसंपर्क वाढीस लागेल. व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. मीन:- आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची मदत मिळेल. फसवणुकीपासून सावध रहावे. हाताखालील कामगारांवर लक्ष ठेवा. वेळेचे योग्य नियोजन करा. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर