मेष

आजचा दिवस तुमच्या राशीला प्रभावशाली असणार आहे. त्यामुळे मोठ्या योजनांची अंमलबजावणी करावी. मारुती मंदिरामध्ये शेंदूर अर्पण करावा.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

काल ज्या कामांना पुढे ढकलले होते. जी कामे करता आली नाही. ज्यांचा पाठपुरावा केला त्या कामांना करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस सुरू करावा. आर्थिक चिंता कमी होतील. थोडा प्रवास करावा लागेल. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. मारुती मंदिरात स्त्रोत्र म्हणून दिवसांची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज दिवसभर चंद्राचे भ्रमण मकर राशीत असणार आहे. ते मिथुनला अनुकूल नसणार आहे. महत्त्वाच्या गोष्टीचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रवास टाळावेत. वेळ पाळावी. ओम देवभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

आज मकरेतून चंद्राचे भ्रमण व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देणारा आहे. वैवाहिक जीवनात सुसंवादाचे योग आहेत. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. प्रवासाचे योग आहेत. व्यावसायिक हितसंबंध जोपासता येतील. ओम विश्वभ्यो देवभ्यो नमः २१ वेळा जप करावा.
आजचा रंग – पिंगट

सिंह

संपूर्ण दिवस शांततेत घालवावा. आजची ग्रहदशा सिंहेच्या व्यक्तींना फारशी चांगली नाही. प्रवास, नातेसंबंध व्यवहार सगळ्याच बाबतीत एक पाऊल मागे ठेवाव. धाडस करू नये.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

जुन्या योजना कार्यान्वित करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नवीन कामांच्या शुभारंभासाठी आज योग्य दिवस आहे. प्रवासाचे योग आहेत. शनी मारुती मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

तुळ

आज कामानिमित्त किंवा कुटुंबासाठी प्रवासाचे योग येतील. या आठवड्याचे फलित म्हणून की काय आज एखादी शुभ वार्ता समजेल आनंदी दिवस जाईल. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

मकरेतील चंद्राचे भ्रमण प्रवासाचे योग येतील. बऱ्याच वर्षानंतर एखाद्या नातेवाईकाची किंवा मित्राची गाठ होईल. आनंदात दिवस जाईल. प्रवासाची दगदग जाणवेल. मारुती दर्शन घेणे.
आजचा रंग – पिवळा

धनु

जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील, व्यावसायिक हितसंबंध वाढतील. वेळेचे नियोजन ठेवावे लागेल. स्त्रियांनी वातविकाराकडे लक्ष द्यावे. मारुतीला शेंदूर अर्पण करावा.
आजचा रंग – केशरी

मकर

आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आज आनंदी उत्साही दिवस असेल. अधिकारी, सहकाऱ्याचे सहकार्य लाभेल. आज अनेक चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडतील. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. कुटुंबासोबत, मित्र मंडळीसोबत वेळ चांगला जाईल. अभ्यंग स्नान करणे. मारुती दर्शन घेणे. हनुमान कवच म्हणणे.
आजचा रंग –  पांढरा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. शुभ दिवस आहे. ग्रहदशेची साथ नव्हती. ती आज लाभणार आहे. त्यामुळे महत्त्वांच्या कामांची अंमलबजावणी करण्यास योग्य दिवस. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल, जुने मित्र भेटण्याचे योग. हनुमान चालीसा पाठ करणे.
आजचा रंग – जांभळा

मीन

आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आज अतिरिक्त कामांचा ताण पडेल, स्वास्थ ठेवावे. कामांची जबाबदारी वाढेल. पुढील आर्थिक नियोजन करू शकाल. व्यायाम करावा. हनुमान चालिसाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पिंगट

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader