- मेष:-
दिवसभर कामाची दगदग राहील. काही बदल अपरिहार्य असतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. गप्पा-गोष्टींमधून वादाला तोंड फुटणार नाही याची काळजी घ्यावी. मुलांची समस्या जाणून घ्यावी. - वृषभ:-
जोडीदाराला चांगला आर्थिक लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. चहाडखोर व्यक्तींपासून त्रास होण्याची शक्यता आहे. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. नातेवाईकांना मदत कराल. - मिथुन:-
पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. खेळाची आवड पूर्ण करून घ्याल. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा प्रभाव पडेल. सट्टा, जुगार या खेळांची आवड पूर्ण कराल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. - कर्क:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारीत समाधानी असाल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. घरातील वातावरण शांततेचे ठेवावे. जवळचे मित्र भेटतील. - सिंह:-
प्रवासात काळजी घ्यावी. मुलांचे प्रश्न समजून घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. घरगुती कामातील अडचण दूर करावी. कौटुंबिक खर्चाचे भान ठेवावे. - कन्या:-
वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. साहसाने कामे हाती घ्याल. गप्पांमधून सुयोग्य संवाद साधावा. खर्च करतांना हात आखडता घ्यावा लागेल. तुमच्यातील धाडस वाढेल. - तूळ:-
उष्णतेचे त्रास जाणवू शकतात. हस्तकलेत रमून जाल. जवळच्या प्रवासात थोडी काळजी घ्यावी. काही कामात अधिक कष्ट पडतील. कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. - वृश्चिक:-
कामाचा व्याप वाढेल. कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल. चोरांपासून सावध राहावे. आर्थिक बाबतीत फसवणुकीपासून सतर्क राहावे. योग्य कागदपत्रेच सादर करावीत. - धनु:-
लहान मुलांच्यात रमून जाल. जमिनीच्या कामात लक्ष घालाल. हातातील कामात अपेक्षित यश मिळेल. सतत काहिनाकाही खटपट करत राहाल. मनातील प्रबळ इच्छेकडे लक्ष द्यावे. - मकर:-
मनाप्रमाणे दिवस घालवाल. मनाची चंचलता जाणवेल. कामाच्या ठिकाणी संयमाने वागावे. कमिशनच्या कामाकडे लक्ष द्या. प्रयत्नात कसूर करू नका. - कुंभ:-
मानसिक स्थैर्य जपावे. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. इस्टेटीच्या कामात वेळ जाईल. कामाची योग्य पोचपावती मिळेल. - मीन:-
जवळचे नातेवाईक भेटतील. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. व्यावसायिक प्रगतीकडे अधिक लक्ष द्यावे. उपासनेचे बळ वाढवावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 01-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 01 december 2019 aau