• मेष:-
    मुलांच्या धांधरटपणाकडे लक्ष ठेवावे. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदाराची नाराजी दूर करावी. नवीन मित्र जोडाल. बौद्धिक चुणूक दाखवाल.
  • वृषभ:-
    काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. सरकारी कामात अडकाल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. मानसिक शांततेला महत्त्व द्यावे.
  • मिथुन:-
    प्रवास करावा लागेल. भावंडांची चांगली साथ मिळेल. कामे स्वत:च्या हिंमतीवर कराल. पराक्रमाला वाव मिळेल. चांगला धनलाभ संभवतो.
  • कर्क:-
    खर्चाला आवर घालावी लागेल. कौटुंबिक जबाबदारी उचलाल. तारतम्याने विचार करावा. कामात अतिघाई करून चालणार नाही. उदारपणा दाखवाल.
  • सिंह:-
    मैत्रीचे संबंध जपावेत. चटकन मत दर्शवू नका. संयम बाळगावा लागेल. दिवस मौज-मजेत घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
  • कन्या:-
    व्यावसायिक लाभ मनाजोगा होईल. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. काही गोष्टी क्षणिक भासतील. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. जुन्या गोष्टींमध्ये अडकू नका.
  • तूळ:-
    मानसिक व्यग्रता जाणवेल. मानाने पैसा कमवाल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल. महिला मौल्यवान वस्तू खरेदी करतील. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.
  • वृश्चिक:-
    कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. अंगीभूत कलेला वाव मिळेल. काही कामे खोळंबून राहू शकतात. सरकारी कामावर लक्ष द्यावे. काहीतरी नवीन करण्यावर भर द्याल.
  • धनु:-
    एकाच कामावर लक्ष केंद्रित करावे. शैक्षणिक कामात गती येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल.
  • मकर:-
    घेतलेल्या ज्ञानाचा योग्य वापर कराल. सेवावृत्तीचे महत्त्व जाणाल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल. हातातील कामे वेळेवर पार पडतील. पाठीचा त्रास जाणवू शकतो.
  • कुंभ:-
    जोडीदाराशी मतभेद संभवतात. मुलांच्या काही गोष्टी समजून घ्याव्यात. जोडीदाराला आर्थिक लाभ होईल. कामानिमित्त बाहेर राहावे लागेल. मैत्री अधिक दृढ होईल.
  • मीन:-
    मनाची चंचलता जाणवेल. कामात अपेक्षित यश येईल. आरोग्यात सुधारणा होईल. चोरांपासून सावध राहावे. हितशत्रूंवर विजय मिळवाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 01 september 2019 aau