मेष

आज देवाला दुध, भाताचा नैवेद्य दाखवावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेची आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठ्या आर्थिक गुंतवणूकीचे निर्णय घेत अ‍सताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –लाल

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
From November 16 the fortunes of these zodiac signs
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकू शकते, ग्रहांचा राजा सूर्याचा नकारात्मक प्रभाव संपणार
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

वृषभ

आज ॐ द्रा गुरूवै नमः या नामाचा जप करावा. महत्वाचे व्यावसायिक निर्णय घेवू शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडीटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

ॐ आदित्याय नमः या मंत्राचा जप करून दिवसाची सुरूवात करावी. कुटूंबाशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळीच्या प्रकृतिची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिक, फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –नारंगी

कर्क

पशुपक्ष्यांना अन्नदान करावे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल, परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –पांढरा

सिंह

कालभैरवांचे दर्शन घ्यावे. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग -हिरवा

कन्या

ॐ श्री आदि गुरूवै नमः या मंत्राचा जप करावा. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग –पांढरा

तुळ

पशुपक्ष्यांना अन्नदान करावे. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, जमिनीची खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांनी विशेष दक्षता घ्यावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग -हिरवा

वृश्चिक

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग –निळा

धनु

कुलदैवतांचे पुजन करावे. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अ‍नुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –पांढरा

मकर

महादेवाचे दर्शन घ्यावे. परदेशांशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल.
आजचा रंग –लाल

कुंभ

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग- आकाशी

मीन

कालभैरवाचे दर्शन घ्यावे, दानधर्म करावा. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडीटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu