- मेष:-
किरकोळ जखमा होऊ शकतात. हितशत्रूंचा त्रास जाणवू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होतील. नवीन मित्र जोडाल. मानापमानाचे प्रसंग येवू शकतात. - वृषभ:-
गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. जोडीदाराशी वाद संभवतात. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. - मिथुन:-
छुप्या शत्रूंवर विजय मिळवू शकाल. हातातील कामात यश येईल. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. नातेवाईकांना त्रास होण्याची शक्यता आहे. - कर्क:-
मुलांच्या स्वतंत्रवृत्तीत वाढ होईल. पोटाची काळजी घ्यावी. बौद्धिक ताण जाणवेल. सट्टा, जुगार यांपासुन दूर राहावे. मुलांशी जुळवून घ्यावे. - सिंह:-
कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. शेतीतील मालाची योग्य जपणूक करावी. - कन्या:-
न डगमगता कामे करावीत. हटवादीपणा करू नये. टीकेला सामोरे जावे लागेल. वैचारिक मतभेद राहतील. परिस्थितीशी जुळवून घ्यावे. - तूळ:-
धडपड करून कामे मिळवाल. खर्च करताना विचार करावा. स्वभावात उतावीळपणा येईल. बोलतांना सारासार भान राखावे. वादात भाग घेणे टाळावे. - वृश्चिक:-
तुमची दगदग वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. पित्तविकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद वाढू शकतात. हातातील कामावर लक्ष द्यावे. - धनु:-
खर्च वाढू शकतात. जुन्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. कोर्ट-कचेरीची कामे रेंगाळतील. मानसिक स्वास्थ जपावे. आर्थिक प्रकरणात जपून राहावे. - मकर:-
कष्ट काहीसे वाढू शकतात. घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस खटपट करण्यात जाईल. - कुंभ:-
कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. तुमच्या विरोधकांचा त्रास वाढू शकतो. आपली पत सांभाळावी. कामाच्या ठिकाणी नवीन बदल घडून येतील. व्यावसायिकांनी अडचणीतून मार्ग काढावा. - मीन:-
प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. वडीलधार्यांचा विरोध होऊ शकतो. स्वकष्टावर भर द्याल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, रविवार, ०२ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 02-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 02 february 2020 aau