• मेष:-
    चांगले गृहसौख्य लाभेल. मित्रमंडळींचा गोतावळा जमेल. गप्पांमध्ये दिवस मजेत जाईल. व्यावहारीक ज्ञान वापरण्याची योग्य संधी मिळेल. कामाची उत्तम पकड जमेल.
  • वृषभ:-
    तुमच्या मताचा मान राखला जाईल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. शाब्दिक चकमक टाळा. प्रवासात काळजी घ्यावी. उत्तम परीक्षण कराल.
  • मिथुन:-
    कौटुंबिक खर्च वाढेल. आवक चांगली राहील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. अत्यंत लाघवी शब्द वापराल. आवडते पदार्थ चाखाल.
  • कर्क:-
    कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. मनाची चंचलता जाणवेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पित्तविकार जाणवतील.
  • सिंह:-
    इतरांवर तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे. झोपेची तक्रार जाणवू शकते. दिवस चैनीत घालवाल. कागदपत्रे जपून ठेवावीत.
  • कन्या:-
    कामाच्या बाबतीत समाधानी असाल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. मित्रांची मदत होईल. नवीन वाहन खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
  • तुळ:-
    व्यावसायिक लाभ चांगला होईल. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. आर्थिक जम बसेल. कलेतून चांगला फायदा संभवतो. नवीन ओळखी होतील.
  • वृश्चिक:-
    तांत्रिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न कराल. स्वकष्टावर भर द्यावा. कामातील दिरंगाई टाळावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. प्रवासात काळजी घ्यावी.
  • धनु:-
    चिकाटी सोडून चालणार नाही. मनावरची मरगळ झटकावी लागेल. हातातील कामावर अधिक भर द्यावा. अचानक धनलाभ होईल. गैरसमज टाळावा.
  • मकर:-
    जवळच्या व्यक्तीची मानसिकता जाणून घ्यावी. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील. प्रेमसौख्यात पुढाकार घ्यावा. भागीदारीतील जम नीट बसवावा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
  • कुंभ:-
    आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर मात कराल. कोर्टकचेरीची कामे निघतील. कौटुंबिक सौख्यात रमाल. हातातील कामे पूर्ण होतील.
  • मीन:-
    हट्टीपणा सोडवा लागेल. तुमच्या कामाचे कौतूक केले जाईल. प्रेमसंबंध सुधारतील. तुमच्या मताला विरोध केला जावू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader