- मेष:-
तुमची छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. गुह्यभागाचे त्रास जाणवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. भावनिक विचार मांडाल. व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. - वृषभ:-
मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. योग्य वेळेची वाट पाहावी. समय सुचकता बाळगावी. घाईने निर्णय घेतले जातील. - मिथुन:-
मनातील इच्छेला महत्व द्याल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. शेअर्सच्या कामात यश येईल. कामाची गती वाढवावी. निराशा मनातून दूर सारावी. - कर्क:-
एककल्ली विचार करू नका. मुलांची स्वच्छंदी वृत्ती समजून घ्यावी. जोडीदाराचा प्रेमळपणा वाढेल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. कामात ऊर्जा जाणवेल. - सिंह:-
तुमच्या नावलौकिकात भर पडेल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. कौटुंबिक शांतता जपावी. वाहनांच्या वेगावर मर्यादा घालावी. जमीन-जुमल्याच्या कामात यश येईल. - कन्या:-
परिस्थितीतून मार्ग काढाल. संघर्षाला बळी पडू नका. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद संभवतात. हातापायाच्या दूखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. - तूळ:-
भागीदारीत खुश असाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. श्रमाला घाबरू नका. उतावीळपणा उपयोगाचा नाही. चुकून भडक बोलले जाऊ शकते. - वृश्चिक:-
कामातील जोम वाढेल. ध्येय साध्य करण्याकडे लक्ष द्याल. दुसऱ्यांवर हुकूमत गाजवाल. रागावर नियंत्रण ठेवावे. उष्णतेचे त्रास जाणवेल. - धनु:-
सामाजिक वादात लक्ष घालू नका. कामे वेळेत पूर्ण करा. अडचणींवर मात करावी. वक्तृत्वाची संधी मिळेल. आशादायी दृष्टिकोन ठेवावा. - मकर:-
दिवस आनंदात घालवाल. हातातील कामात यश येईल. सुखासीन वृत्ती वाढेल. चैनीकडे अधिक लक्ष लागेल. झोपेची तक्रार राहील. - कुंभ:-
सामाजिक कामात जपून राहावे. आपली प्रतिष्ठा जपावी. कामाच्या ठिकाणी वादाचे मुद्दे आणू नयेत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. अनपेक्षित अडचणीतून मार्ग काढावा. - मीन:-
प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठ आपल्यावर नाराज होऊ शकतात. आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला स्त्री सहवास लाभेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, रविवार, ०५ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
![आजचे राशीभविष्य, रविवार, ०५ जानेवारी २०२०](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2019/12/Astro.jpg?w=1024)
First published on: 05-01-2020 at 00:55 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 05 january 2020 aau