- मेष:-
सेवेचे महत्त्व जाणाल. धार्मिक गोष्टीची आवड जोपासाल. शैक्षणिक कामाला गती येईल. विरोधकांचा त्रास जाणवेल. हातातील कामे रेंगाळू शकतात. - वृषभ:-
जुगारात अपयश येवू शकते, सावध राहावे. लोकोपवादापासून दूर राहावे. नातेवाईकांचा ससेमिरा मागे लागू शकतो. नसत्या चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. चुकीची संगत लागू शकते. - मिथुन:-
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वातविकारांचा त्रास जाणवू शकतो. कामानिमित्त दूरचा प्रवास घडेल. मुलांच्या दुखण्याकडे लक्ष द्यावे. कलेतून चांगले मानधन मिळेल. - कर्क:-
उधळपट्टी टाळावी. गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करावा. मागचापुढचा विचार करून मगच निर्णय घ्यावा. नसत्या वादात अडकू नये. वडिलधाऱ्यांच्या रागाला बळी पडाल. - सिंह:-
उष्णतेचे विकार जाणवतील. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. काही कामांमध्ये अधिक लक्ष घालावे लागेल. श्रमाचा थकवा जाणवेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. - कन्या:-
आवाक्याबाहेरील खर्च टाळावेत. तुमच्यावर आळ येण्याची शक्यता आहे. पायाचे त्रास जाणवू शकतात. स्त्रीवर्गाच्या बाबतीत सावध भूमिका घ्यावी. फार चिंता करू नये. - तूळ:-
कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. अपेक्षित लाभाने आपण खुश असाल. वाहन विषयक कामे पूर्ण होतील. जमिनीच्या व्यवहारात यश येईल. वरिष्ठ तुमच्यावर खुष असतील. - वृश्चिक:-
व्यावसाईक चिंता सतावेल. कलेतून आर्थिक फायदा संभवतो. सरकारी कामात अडकून पडाल. जोडीदाराची कमाई वाढेल. चुकीच्या कामात हात घालू नये. - धनु:-
तुमचे स्थान सिध्द कराल. शांतपणे विचार कराल. कामातील क्षुल्लक चुका दूर कराव्यात. घरात काही बदल करावे लागतील. खर्चाचा प्रश्न सोडवाल. - मकर:-
मानसिक व्यग्रता जाणवेल. एकच विचार फार काळ मनात ठेवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. कामात मन गुंतवावे. हातातील कामे वेळेत पूर्ण होतील. - कुंभ:-
व्यावसायिक लाभ समाधानकारक असेल. वरिष्ठ व्यक्तींचा सहवास लाभेल. आरोग्याबाबत सतर्क राहावे. तुमच्या कामाची योग्य दखल घेतील जाईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. - मीन:-
उद्योग-धंद्यात बारीक लक्ष घालावे. चुकीचे विचार मनातून काढून टाकावेत. काही व्यावसायिक बदल संभवतात. चुकीच्या लोकांच्या संगतीत अडकू नका. पैसा जपून वापरावा लागेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, रविवार, ०८ सप्टेबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 08-09-2019 at 08:21 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 08 september 2019 aau