मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलस्वामिनी व कुलदैवतांचे दर्शन घ्यावे. परदेशांशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल.
आजचा रंग –निळा

वृषभ

कालभैरवांचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

कुलदैवतांचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडीटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –आकाशी

कर्क

ॐ इंद्राग्निभ्मा नमः या मंत्राचा जप करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेची आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठ्या आर्थिक गुंतवणूकीचे निर्णय घेत अ‍सताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पिवळा

सिंह

कालभैरवाचे दर्शन घ्यावे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊ शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडीटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग -निळा

कन्या

कालभैरवाचे दर्शन घ्यावे. कुटूंबाशी निगडीत अडी-अ‍डचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळीच्या प्रकृतीची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक, फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –गुलाबी

तुळ

कुलदैवतेचे दर्शन घ्यावे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल, परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग -निळा

वृश्चिक

ॐ हरये नमः या मंत्राचा जप करावा. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग –पांढरा

धनु

कालभैरवाची उपासना करावी. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग –निळा

मकर

ॐ हरये नमः या मंत्राचा जप करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग –नारंगी

कुंभ

द्रां गुरवे नम: आज या नामाचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होतील. भावंडांच्या गाठीभेटी होतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- पांढरा

मीन

कालभैरवांचे दर्शन घ्यावे. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अ‍नुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 09 december
Show comments