1. मेष:-
    घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. मानसिक शांतता जपावी. वरिष्ठांना नाराज करू नका. गप्पा मारण्यात दिवस घालवाल. लहानांशी मैत्री-पूर्ण वागणूक ठेवाल.
  2. वृषभ:-
    जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनातील गैरसमज दूर सारावेत. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कंजूषपणा करू नका. उगाच चिडचिडपणा करू नये.
  3. मिथुन:-
    वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. भागीदाराची बाजू समजून घ्या. शक्यतो मतभेद दर्शवू नका. वैवाहिक सौख्य जपावे. ऐहिक गोष्टींपासून दूर व्हावे.
  4. कर्क:-
    मोहाळा बळी पडू नका. मानसिक स्वास्थ्याला महत्व द्यावे. भावंडांची चिंता लागून राहील. गुरूजनांचा आशीर्वाद घ्यावा. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.
  5. सिंह:-
    खिलाडू वृत्तीत वाढ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. अतिकाळजी करू नका. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे.
  6. कन्या:-
    कौटुंबिक समस्या जाणवतील. नातेवाईकांची मदत मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रेम सौख्यात भर पडेल. मैत्रीचे संबंध दृढ होतील.
  7. तुळ:-
    वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरणात बारकाईने लक्ष घाला. वाचनाची आवड जोपासाल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
  8. वृश्चिक:-
    कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यापारीवर्गाला चांगला लाभ होईल. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. सांपत्तिक स्थितीकडे लक्ष ठेवा. रागावर नियंत्रण ठेवावे.
  9. धनु:-
    उतावीळपणा करू नये. जोमाने कामे हाती घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
  10. मकर:-
    कामे विनाकारण अडकून पडल्यासारखी वाटतील. आध्यात्मिक ओढ वाढेल. सामाजिक बांधीलकीची जाण ठेवावी. सामुदायिक वादाकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.
  11. कुंभ:-
    मैत्रीत मतभेद आड आणू नका. दिवसभर खटपट करावी लागेल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. थोरांचा सल्ला घ्यावा लागेल. कामातून समाधान शोधाल.
  12. मीन:-
    कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्याल. काही बदल अचानक घडून येऊ शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. अधिकारी व्यक्तींमध्ये वावराल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याचे बेत आखाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader