मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालभैरव अष्टकाचा पाठ करावा, गुरू वंदन करून दिवसाची सुरूवात करावी. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. अनेकांचे सहकार्य लाभेल. कारखानदारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होईल.
आजचा रंग –पिवळा

वृषभ

कुलस्वामिनी आणि कुलदैवतेचे दर्शन घ्यावे. सावधपणे निर्णय घ्यावेत. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल करीत असताना विचारविनिमय करून निर्णय घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक जपून करावी.
आजचा रंग –नारंगी

मिथुन

महादेव मंदिरामध्ये एक मुठ तांदुळ अर्पण करावे आणि दर्शन घ्यावे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक उलाढाल राहील. उत्तम निर्णय क्षमतेचा दिवस. कमोडिटी मार्केट, शेअर्स मधील गुंतवणूकदारांना अनुकूल ग्रहमान आहेत. नवीन योजना राबविता येतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –हिरवा

कर्क

कुलदैवताचे स्मरण करून दिवस आनंदात घालवावा. अधिकार संपन्नता येईल. शेती, बांधकाम व्यावसायिक, कमोडिटी मार्केट, शेअर्स, इंटेरिअर डेकोरेटर यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींबरोबर वेळ आनंदात जाईल. प्रवासाचे योग संभवतात. सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहेत.
आजचा रंग –पोपटी

सिंह

महादेवाचे आणि कालभैरवांचे दर्शन घ्यावे. भाग्यकारक ग्रहमान आहेत. नोकरी, व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाचे बदल घडविण्यासाठी सर्वांची साथ मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. परदेशाशी निगडीत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

कुलदैवतेचे स्मरण करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. दूरचे, दगदगीचे प्रवास टाळावेत. उष्णता आणि वातविकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील.
आजचा रंग –लाल

तुळ

ग्रामदैवतेची पुजा करावी. व्यावसायिक सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करता येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आर्थिक आवक उत्तम राहील. गुंतवणूक करीत असताना सावध राहावे. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध राहावे. सामाजिक क्षेत्र, कलेशी निगडीत क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींनी सावधपणे दिनक्रम करावा. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –आकाशी

धनु

आज कुलदैवतेच्या मुळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धाडसी निर्णयांचा पाठपुरावा करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

मकर

कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे. भागिदारी व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना सावध राहावे. बांधकामाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –तपकिरी

कुंभ

ॐ श्री आदित्याय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग-लाल

मीन

आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूकीस अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी, शेअर्स, शेती, स्टेशनरी, कापड व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.
आजचा रंग –निळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 10 june
Show comments