• मेष:-
    वाहन चालवितांना काळजी घ्यावी. मन:शांती राखण्याचा प्रयत्न करावा. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. घरात नीटनेटकेपणा ठेवाल.
  • वृषभ:-
    इतरांच्या मदतीशिवाय कामे कराल. सारासार बुद्धीचा वापर करावा. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्या. न्यायी वृत्ती दर्शवाल.
  • मिथुन:-
    गायन कलेत प्रगती कराल. उदारपणा दाखवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. आवडी-निवडीवर अधिक भर द्याल. घशाचे विकार त्रास देवू शकतात.
  • कर्क:-
    मानीपणा दाखवाल. तुम्हाला सामाजिक दर्जा मिळेल. आपले मत उत्तमपणे मांडाल. हजरजबाबीपणा दाखवाल. कामाचा ताण जाणवेल.
  • सिंह:-
    प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. शाब्दिक चकमक टाळावी. विचारांना योग्य चालना द्यावी.
  • कन्या:-
    सामाजिक वादात सहभाग घेवू नये. लहान मुलांमध्ये रमून जाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत. प्रवासात सतर्कता ठेवावी.
  • तुळ:-
    मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. सतत खटपट करत रहाल. मैत्रीत सलोखा ठेवावा. व्यावसायिक फायद्याचा विचार कराल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधावा.
  • वृश्चिक:-
    व्यावसायीक बदलांना सामोरे जाल. नोकरदारांना बदलीचे योग येतील. हातातील कामास गती प्राप्त होईल. धोरणीपणाने वागाल. धैर्याने कामे कराल.
  • धनु:-
    वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तांत्रिक ज्ञान करून घ्यावे. मैदानी खेळत प्रगती होईल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. चिकाटी सोडू नका.
  • मकर:-
    स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य  द्वीगुणीत होईल. जोडीदाराचे कौतुक कराल. खर्चाचे योग्य नियोजन करावे. संयम बाळगावा.
  • कुंभ:-
    काही बाबींकडे दुर्लक्ष करावे. समजूतदारपणा दाखवावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. इतरांचा विश्वास संपादन करावा. कफ विकार जाणवू शकतात.
  • मीन:-
    भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. तिखट पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवून वागाल. मैत्रीचे संबंध सुधारतील. उष्णतेचे विकार जाणवू शकतात.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर