मेष
आर्थिकदृष्ट्या मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्या संधीचा फायदा घेऊन कर्ज प्रकरणासंबंधी बॅंकांशी संपर्क साधावा. आज देवाला दूध भाताचा नैवेद्य दाखवून कामाची सुरुवात करावी. आर्थिक येणी असतील तर आजच्या दिवशी पाठपुरावा करावा.
आजचा रंग – पुरुषांसाठी – पांढरा, महिलांसाठी – मरून
वृषभ
ओम द्रा गुरवे नमः या नामाचा जप करणे. आज मेष राशीत चंद्र भ्रमण असल्याने दिवस काळजीपूर्वक घालवावा. कोणताही आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये.
आजचा रंग – राखाडी
मिथुन
मेष राशीतील चंद्राचे भ्रमण व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करणारे ठरणार आहे. वरिष्ठांच्या सकारात्मकतेमुळे कामांतील उत्साह वाढले. ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – लाल
कर्क
मेषेचा चंद्र आणि रविवार म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम दिवस आहे. अनेक दिवसांच्या धावपळीत कुटुंबाला वेळ देता आला नसेल तर आज नियोजन करावे. कालभैरवाचे दर्शन घ्यावे
आजचा रंग – राखाडी
सिंह
महत्त्वाच्या निर्णयासाठी, नवीन कामाच्या, गाठीभेटींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. पशुपक्ष्यांना अन्नदान करावे.
आजचा रंग – नारंगी
कन्या
महत्त्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. एकट्याने निर्णय घेऊ नयेत. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. तब्येतीची काळजी घ्यावी. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – जांभळा
तुळ
साडेसातीचा काम करणारा दिवस. नवीन संधी उपलब्ध होतील. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करताना काळजीपूर्वक करावा. पशुपक्ष्यांना अन्नदान करावे.
आजचा रंग – पिवळा
वृश्चिक
आज अष्ठमातला चंद्र सावधपणे दिवस आखा. योजना नीट समजावून घ्या. घाईघाईत निर्णय नको. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा
धनु
धनुराशीला आजचा दिवस साडेसातीचा ताण कमी करणारा आहे. त्यामुळे कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. ताण तणाव कमी होतील. कुलदैवताचे पूजन करावे.
आजचा रंग – हिरवा
मकर
वरिष्ठांच्या सहकार्याने नोकरी, व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बढतीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास योग्य दिवस आहे. स्त्रियांना सुखकारक दिवस आहे. महादेवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा
कुंभ
अपेक्षित गोष्टींचे लाभ मिळण्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. पूर्वी प्रयत्न केलेल्या गोष्टी साध्य होऊ शकतात. अनुसंधान ठेवावे. प्रगतीकारक दिवस आहे. त्याचा लाभ घ्यावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी
मीन
नोकरदार, व्यावसायिकांसाठी साधारण दिवस. महत्त्वाचे निर्णय, भेटीगाठी पुढे ढकलाव्यात. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्ठांमध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा. कालभैरवाचे दर्शन घ्यावे. दानधर्म करावा.
आजचा रंग – तपकिरी
– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu