- मेष:-
काही गोष्टींपासून दूर राहवेसे वाटेल. जमीनकीच्या व्यवहारातून फायदा संभवतो. चंचलतेल दूर सारावे लागेल. चोरांपासून सावध राहावे. घरगुती कामात दिरंगाई संभवते. - वृषभ:-
कामात स्त्री वर्गाची मदत घेतली जाईल. नवीन कपडे खरेदी कराल. कामातील द्विधा मनःस्थिती बाजूला सारावी. काहीतरी वेगळे करण्यावर भर द्याल. मित्रांमध्ये प्रशंसेस पात्र व्हाल. - मिथुन:-
एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करावे. घराकडे अधिक लक्ष द्याल. जमिनीच्या प्रकरणातून फायदा संभवतो. कामाच्या ठिकाणी मान मिळवाल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. - कर्क:-
धार्मिक स्थळांना भेट द्याल. गुरूजनांचा आशिर्वाद मिळेल. तुमच्यातील श्रध्दा वाढीस लागेल. दृष्टीकोन बदलून पहावा. स्वतः चा मान राखून काम कराल. - सिंह-
दोन पावले मागे येण्यास कचरू नका. ध्यानधारणा करावी. इतरांच्या वागण्याचा फार विचार करु नये. अचानक धनलाभाची शक्यता. इतरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊ नका. - कन्या:-
एकमेकांमधील गैरसमज दूर करावेत. प्रेमळपणे बाजू समजून घ्यावी. भागीदारीत समाधानी असाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मत स्पष्टपणे मांडावे. - तूळ:-
मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. प्रेम प्रकरणात जिव्हाळा वाढेल. संसर्गजन्य विकार बळावू शकतात. कलहापासून दूर रहावे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. - वृश्र्चिक:-
मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. नाटक बघण्याचा कार्यक्रम आखाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. भावनिक विचार मांडाल. खेळातून कमाई होईल. - धनू:-
सर्व गोष्टीत आपुलकीने रस घ्याल. बागकामाची आवड जोपासाल. प्रवास मजेत होईल. चांगली मन:शांती लाभेल. कामाचे समाधान मिळेल. - मकर:-
लहरीपणे वागणे टाळावे. तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल. एकलकोंडेपणा बाजूला सारावा. जून्या गोष्टी उगाळत बसू नये. उत्तम साहित्य वाचाल. - कुंभ:-
आपले मत स्पष्टपणे मांडावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आवडी-निवडी बाबत जागरूक रहाल. गुंतवणूकीचा नवीन पर्याय शोधावा. सर्वांना मधूर वाणीने जिंकून घ्याल. - मीन:-
जोडीदाराचा वरचष्मा राहिल. भागीदाराशी मतभेद वाढवू नयेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. पोटाच्या विकारांवर वेळीच उपचार करावा. कौटुंबिक गोष्टीत सर्वप्रथम लक्ष घालावे.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, रविवार, १३ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 13-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 13 october 2019 aau
Show comments