मेष
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. संमिश्र लाभाचा दिवस आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी कामगारांशी सलोख्याने वागावे. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पिवळा
वृषभ
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. संमिश्र लाभाचा दिवस आहे. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. संमिश्र लाभाचा दिवस आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण-तणाव जाणवेल. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. खर्च संभवतो. कुलदैवतेचे स्मरण करावे. दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा
कर्क
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. संमिश्र लाभाचा दिवस आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. संततीसौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज कुलदैवतेचे मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा
सिंह
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. संमिश्र लाभाचा दिवस आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे.
आजचा रंग – पिवळा
कन्या
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भावंडाच्या भेटीगाठी होतील. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ग्रामदैवतेची पूजा करावी.
आजचा रंग – नारंगी
तुळ
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुलीच्या दृष्टीने योग्य दिवस. कुलदैवतेचे स्मरण करावे.
आजचा रंग – पिवळा
वृश्चिक
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यासाठी, आखणीसाठी उत्तम दिवस. महादेवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा
धनु
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाली सावधपणे करणे. कुलदैवतेचे स्मरण करुन दिवस आनंदात घालवावा,
आजचा रंग – आकाशी
मकर
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भावंडाच्या भेटीचे योग. जुने मित्र भेटू शकतात. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांनाा नवीन संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. महादेव मंदिरामध्ये एक मूठ तांदूळ अर्पण करणे.
आजचा रंग – मोरपंखी
कुंभ
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी ग्रहमान चांगले. कुलस्वामिनी आणि कुलदैवतेचे दर्शन करावे.
आजचा रंग – पांढरा
मीन
आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. व्यवसायामध्ये प्रगती कराल. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. कालभैरव अष्टकाचा पाठ करावा.
आजचा रंग – पोपटी
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu