- मेष:-
तुमचा सल्ला घेतला जाईल. मनातील इच्छा पूर्ण करण्यावर भर द्याल. तुमचा चाहतावर्ग वाढेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक प्रश्न सुटेल. - वृषभ:-
कार्यक्षेत्र विस्तारण्यावर लक्ष द्यावे. कामासाठी लहान प्रवास करावा लागेल. स्वत:च्या मताचा हक्क गाजवाल. कामाची लगबग राहील. शेजार धर्म पाळाल. - मिथुन:-
योग्य मार्गदर्शन मिळेल. गुरुकृपेचा लाभ घ्याल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मदतीला धावून जाल. सामाजिक जाणीव ठेवाल. - कर्क:-
छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. निष्ठा ढळू देवू नका. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कौटुंबिक शांतता राखावी. - सिंह:-
प्रेमसौख्याला रंग चढेल. व्यापारी संस्थांवर लक्ष ठेवा. मुलांना प्रवासात सहाय्य कराल. कामाला अधिक गती येईल. खर्च वाढू शकतो. - कन्या:-
संघटन कार्यात यश येईल. स्पर्धेत यश मिळवाल. कामगार वर्ग खुश असेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. - तुळ:-
लहान प्रवास चांगला होईल. कामात आईची साथ लाभेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आवडते छंद जोपासाल. महत्त्वाची कामे पुढे सरकतील. - वृश्चिक:-
धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. घरात मंगलकार्य निघेल. कौटुंबिक वातावरणात रमाल. - धनु:-
वादन कलेला चांगला वाव मिळेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. माहितीचा योग्य वापर करावा. भावंडांची मदत घ्याल. प्रवास मजेत होईल. - मकर:-
बँकेचे काम कराल. गुंतवणुकीच्या कामात लक्ष घालाल. शेअरमधील गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार कराल. कौटुंबिक सौख्यात रमाल. आवडीच्या गोष्टींवर भर द्याल. - कुंभ:-
इतरांवर तुमचे प्रभुत्व राहील. पत्नीशी वाद वाढवू नयेत. अपचनाचा त्रास जाणवेल. भागादारीतील बदल सकारात्मक विचारातून करावेत. किरकोळ वाद टाळावेत. - मीन:-
ध्यानधारणा करण्यावर भर द्यावा. सामाजिक बांधिलकी जपाल. कामाच्या बाबतीत संतुष्ट असाल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. मानसिक शांतता जपावी.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, रविवार, १८ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 18-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 18 august 2019 aau