मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस पराक्रमाचा ठरणार आहे. चंद्राचे सिंह राशीतील भ्रमण अनपेक्षित लाभ देणारे ठरू शकते. कुठल्याही संधीला डावलू नये. आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग- पांढरा

वृषभ

आज दुपारपासून सिंह राशीमध्ये चंद्राचे भ्रमण असणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आप्तेष्टांच्या सुवार्तेमुळे आजचा दिवस आनंदी जाईल. ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करणे.
आजचा रंग- तपकिरी

मिथुन

आज मिथुनसाठी दिवस साधारण आहे. सिंह राशीतील चंद्राचे भ्रमण तितकेसे यशदायी नाही. त्यामुळे मोठे निर्णय घेऊ नये. मित्र मंडळीसोबत दिवस आंनदात घालवाल. कुलदैवतेचे स्मरण करावे आणि दर्शन घ्यावे.
आजचा रंग- तपकिरी

कर्क

आर्थिक प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने योग्य दिवस आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करुन महत्त्वाचे निर्णय घ्यावे. आज कुलदैवतेचे मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

सिंह

सिंह राशीला आजचा दिवस भाग्यकारक ठरणार आहे. दुपारनंतर काही चांगल्या कामाचे नियोजन करू शकाल. दुपारनंतरचा दिवस आनंददायी जाईल. गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

महत्वाचे निर्णय टाळावेत. दिवस शांततेत घालवावा. वादविवाद टाळावेत. ग्रामदैवतेची पूजा करावी.
आजचा रंग – पिवळा

तुळ

काही ठाराविक निर्णयामध्ये लहानांची मदत होईल, त्यांचा सल्ला मानावा. एकट्याने निर्णय घेऊ नये. कुलदैवतेचे स्मरण करावे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

धडाडीने घेतलेल्या निर्णयांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या योजनांचा पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा. महादेवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पिवळा

धनु

आजचा धनु राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र असणार आहे. काही प्रसंगाचे अंदाज येण्यास वेळ जाईल, तरी ते पूर्ण झाल्याशिवाय पुढील पाऊल टाकू नये. जाणकारांच्या सल्ल्यानेच पुढील पाऊल टाकावे. कुलदैवतेचे स्मरण करून दिवस आनंदात घालवावा.
आजचा रंग – पिवळा

मकर

आजचा दिवस संमिश्र प्रतिसादाचा आहे. कुठलेही निर्णय तातडीने घेऊ नये. निर्णयासाठी वेळ मागून घ्यावा. गृहिणींनी दिवसभराच्या कामांचे नियोजन व्यवस्थित करावे. महादेव मंदिरामध्ये एक मूठ तांदूळ अर्पण करावे आणि दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

आजचा दिवस आनंदी जाईल. वेळेचे नियोजन ठेवावे. व्यावसायिकांसाठी आज चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्याचा अचूक लाभ घ्यावा. कुलस्वामिनी आणि कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

मीन

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. कदाचित कष्टप्रद, कुटुंबासाठी, मित्र आणि आप्तेष्टांसाठी वेळ द्याल. नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढेल. कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. गुरू वंदन करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader