- मेष:-
गोडीगुलाबीने कामे कराल. हस्तकलेला वेळ काढावा. आवाजात मार्दवता ठेवावी. वक्तृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल. काहीसा विसरभोळेपणा जाणवेल. - वृषभ:-
मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. भावंडांची काही कामे अंगावर पडतील. तुमच्यातील कलागुण दिसून येतील. वाणीत मधुरता ठेवाल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. - मिथुन:-
कामात चालढकल करू नका. भारंभार कामे वाढवून ठेवू नका. जोडीदाराचा समजूतदारपणा दिसून येईल. प्रगल्भपणे विचार करावा. कलागुण सादर करण्याची संधी मिळेल. - कर्क:-
भावनेला आवर घालावी. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. चुकीचे विचार मनातून काढून टाकावेत. चांगले वाहन सौख्य लाभेल. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. - सिंह:-
शाब्दिक चकमक टाळावी. फार तिखट, तामसी पदार्थ खावू नयेत. इतरांच्या मदतीला धावून जाल. गायन कलेला चांगला वाव मिळेल. घरात सांस्कृतिक कार्यक्रम होतील. - कन्या:-
पित्त विकाराचा त्रास जाणवेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. हट्टीपणा करून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टी फार ताणू नका. कौटुंबिक जबाबदारी घ्यावी लागेल. - तूळ:-
कामाच्या व्याप वाढेल. आर्थिक लाभ चांगला संभवतो. जनविरोधाला सामोरे जावू नका. चुकीचे समाज त्रासदायक ठरू शकतात. फार काळजी करत बसू नका. - वृश्चिक:-
चोरांपासून सावध राहावे. सर्व गोष्टीत गुप्तता पाळाल. काही चांगल्या संधी चालून येतील. त्यागाचे महत्त्व जाणून घ्यावे. जवळच्या नातेवाईकांची चौकशी करावी. - धनु:-
घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. घरासाठी सुशोभिकरणाच्या वस्तू खरेदी कराल. महिला मौल्यवान वस्तू खरेदी करतील. - मकर:-
वडिलांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. कामातील स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. संपर्क क्षेत्रातील व्यक्तींना चांगला फायदा संभवतो. अंगच्या कलागुणांना वाव द्यावा. कमिशन मध्ये चांगला फायदा होईल. - कुंभ:-
पैजेवर पैसे लावताना सतर्क राहावे. चुकीच्या संगतीत अडकून पडू नका. आपण घेत असलेली मेहनत योग्यदिशेने आहे का ते तपासावे. करमणुकीचे कार्यक्रम पहाल. दिवस चैनीत घालवाल. - मीन:-
कौटुंबिक गैरसमजाला मनात थारा देवू नका. घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. विचार भरकटू देवू नका. मित्रांशी मतभेद वाढवू नका. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, रविवार, २० ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 20-10-2019 at 01:01 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 20 october 2019 aau