- मेष:-
मानसिक व्यग्रता जाणवेल. काही कामांमध्ये अडकून पडाल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. आधी महत्त्वाची कामे पूर्ण करावीत. भावंडांना सहकार्य करावे. - वृषभ:-
घरगुती जबाबदा-या समर्थपणे पेलाल. क्षुल्लक कारणांवरून चिडू नका. वेळेचे योग्य नियोजन करावे. वैचारिकता बदलून पहावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतूक कराल. - मिथुन:-
चाल-ढकल करण्यात वेळ वाया घालवू नका. एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. हसून वेळ मारून न्याल. नसते धाडस करू नये. खर्च वाढू शकतो. - कर्क:-
भावनेच्या आहारी जाणे टाळावे. चुकीच्या कल्पनांना खत-पाणी घालू नका. बोलतांना सारासार विचार करावा. कौटुंबिक गोष्टी सामोपचाराने सोडवाल. अंगीभूत कलांचे कौतुक केले जाईल. - सिंह:-
परिस्थितीशी जुळवून घ्यावे. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. कामातील अडचण संयमाने दूर करावी. किरकोळ दुखापतीकडे लक्ष द्यावे. दृढ निश्चय कराल. - कन्या:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. बढतीचे योग आहेत. गायन कलेचे कौतुक केले जाईल. गोड बोलून वेळ मारून न्याल. कामाचा थकवा जाणवेल. - तूळ:-
चार माणसात वावरतांना आपली प्रतिष्ठा जपावी. व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने पावूल उचलाल. घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल. नवीन कापडे खरेदी कराल. - वृश्चिक:-
काम करण्याची पद्धत बदलून पहावी. वडिलांची नाराजी दूर करावी. कामात सुसंगतता ठेवावी. काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागेल. तुमच्यातील धडपड दिसून येईल. - धनु:-
वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. उपासनेवर अधिक लक्ष द्यावे. थोर व्यक्तींचा सल्ला घ्यावा. इतरांच्या वागण्याचा विचार करत बसू नका. गुरुजानांवरील श्रद्धा वाढेल, - मकर:-
पाठीचे विकार त्रासदायक ठरू शकतात. उगाचच नसते विचार करत वेळ वाया घालवू नका. अडथळ्यातून मार्ग शोधावा. वारसाहक्काच्या कामात खंड पडू शकतो. चुकीचा मार्ग पकडू नका. - कुंभ:-
जोडीदाराविषयी मतभेदाला मनात थारा देवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. जुगारापासून दूर राहावे. पित्ताचे त्रास संभवतात. वरिष्ठांशी मतभेद होवू शकतात. - मीन:-
जोडीदाराची प्राप्ती वाढू शकते. वैवाहिक सौख्यात भर पडेल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनातून निराशा बाजूला सारावी. अपचनाचा त्रास संभवतो.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, रविवार, २२ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 22-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 22 september 2019 aau