- मेष:-
कौटुंबिक सौख्यात रमाल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ कारणांवरून वाद संभवतात. चर्चेतून समस्या सोडवाव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. - वृषभ:-
जोडीदाराचा वरचष्मा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन अधिकार हातात येतील. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. अचानक धनलाभाची शक्यता. पित्ताचा त्रास जाणवेल. - मिथुन:-
वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. एकमेकांची बाजू उत्तमरित्या समजून घ्याल. कामाच्या ठिकाणी तुमचा रुबाब असेल. गप्पांमधून मैत्री दृढ होईल. - कर्क:-
घरातील कामे वाढतील. स्थावरची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. वाहन विषयक कामे पार पडतील. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. - सिंह:-
भावंडांना मदत कराल. जवळचा प्रवास कराल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका. हातातील कलेकडे लक्ष द्यावे. - कन्या:-
दिवसभर कामाचा ताण राहील. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मानसिक व्यग्रता जाणवेल. घरात धार्मिक कार्यक्रम होईल. हातातील कामात यश येईल. - तूळ:-
डोक शांत ठेवून कामं करावीत. घाईघाईने कुठलीही गोष्ट करू नका. अघळपघळ बोलू नका. कौटुंबिक खर्च वाढेल. क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालू नका. - वृश्चिक:-
अडचणींवर मात कराल. शारीरिक श्रम वाढतील. चिकाटी सोडू नका. मनाची चंचलता जाणवेल. काही कामे एकाच गोष्टीवर अडून पडतील. - धनु:-
मनातील इच्छेला महत्व द्यावे. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा. योग्य संधीची वाट पाहावी. चटकन निराश होऊ नका. पत्नीचा प्रेमळ हट्ट पुरवावा. - मकर:-
व्यापाऱ्यांना चांगला लाभ संभवतो. हातात नवीन अधिकार येतील. कामाची धांदल उडेल. मुलांचे कौतुक कराल. काही गोष्टी क्षणिक आनंद देतील. - कुंभ:-
सरकारी कामात अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. घरातील मोठ्या व्यक्तींचा मान राखावा. प्रवासात सतर्क राहावे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. - मीन:-
मुलांच्या कारवायांवर वेळोवेळी लक्ष ठेवा. गैरसमजाला मनातून काढून टाका. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील कामाला गती मिळेल. अचानक धनलाभ संभवतो.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 24-11-2019 at 00:52 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 24 november 2019 aau