मेष

मोठे निर्णय आज घेऊ नये. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालावा. आजचा दिवस फार मोठ्या उलाढालीचा आणि घडामोडीचा नाही. कुलस्वामिनी आणि कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग- मोरपंखी

वृषभ

कुटुंबासमवेत वेळ घालविण्याचे नियोजन कराल. मोठे प्रवासात टाळावेत. घाईघाईत निर्णय घेऊ नये. संमिश्र दिवस आठवड्याभराचे कामाचे नियोजन करावे. कालभैरवांचे दर्शन घेऊन दिवसाच्या कामांची सुरुवात करावी.
आजचा रंग – जांभळा

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन

मिथुन

संमिश्र दिवस, प्रवास जपून करावेत, वादविवाद टाळावेत, महिलांनी आजाराकडे दुर्लक्ष करु नये. व्यावसायिक निर्णय संध्याकाळ नंतर घेऊ नये. कुलदैवताचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – हिरवा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण तुळ आणि वृश्चिक राशीमध्ये आहे. हे दोन्ही स्थित्यंतर कर्कला लाभदायक आहेत. त्यांच्या निश्चितच फायदा होऊ शकतो. व्यापार व्यवसाय, नोकरी, परदेशी नोकरी करणारे करीअरबाबतीत योग्य निर्णय घेऊ शकतील. ओम इंद्राग्निभ्मां नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग  – राखाडी

सिंह

कुटुंबातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. आनंदी उत्साही दिवस जाईल. नातेसंबंध सुधारू शकाल. कालभैरवांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

कन्या

आज चंद्र तुळेत आहे आणि संध्याकाळी तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. त्यामुळे पराक्रमाचे म्हणजे धाडसाचे योग आहेत. नवीन योजना मार्गस्थ लागतील. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग पांढरा

तुळ

आज संमिश्र फळे देणारा दिवस. परंतु आर्थिक स्थिती बळकट करणारी ग्रहदशा सामाजिक पातळीवर प्रभाव पडेल. नातेवाइक मित्र मंडळीत कौतुकास पात्र व्हाल. कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग हिरवा

वृश्चिक

आजचा दिवस संमिश्र प्रतिसादाचा आहे. नोकरदार वर्गाला मोठ्या जबाबदारीची कामे करावी लागतील. व्यवसायात हाती घेतलेली कामे पुर्ण करण्यात अडचणी जाणवतील. महिलांनी मनस्वास्थ ठीक ठेवावे. ओम हरये नमःचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

संमिश्र फळे देणारे चंद्राचे भ्रमण आहे. आज कुटुंबाला वेळ द्यावा. विनाकारणची दगदग टाळावी. कामाचे नियोजन ठेवावे. पोटाच्या विकाराची काळजी घ्यावी. कालभैरवाची उपासना करणे.
आजचा रंग – निळा

मकर

आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत असणार आहे. तर संध्याकाळी वृश्चिक राशीत आहे. संमिश्र दिवस, प्रवास सावधपणे करावे, सहलीचे योग, कुटुंबासमवेत, मित्र-मंडळीत वेळ घालवाल. विचारमग्न दिवस जाण्याची शक्यता. महादेव मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत असणार आहे. तर संध्याकाळी वृश्चिक राशीत आहे. प्रवासाचे योग आहेत. दगदग वाढविणारा दिवस आहे. आध्यात्मिक प्रगती होईल. गुरू मार्गदर्शन लाभेल. ओम हरये नमः चा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

मीन

आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत असणार आहे. तर संध्याकाळी वृश्चिक राशीत आहे. संमिश्र दिवस, दिवसभर कामांचा तणाव राहील. कुटुंबातील प्रश्न सोडवू शकाल. संध्याकाळी आनंदी उत्साही वातावरण राहील. कालभैरवांचे दर्शन घेणे.
आजचा रंग – तपकिरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu