मेष
कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. गुरू वंदन करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – गडद निळा

वृषभ
कुलस्वामिनी आणि कुलदैवतेचे दर्शन करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
महादेव मंदिरामध्ये एकमुठ तांदूळ अर्पण करावे आणि दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासांचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – सोनेरी

कर्क
कुलदैवताचे स्मरण करून दिवस आनंदात घालवावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरेाबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – लाल

सिंह
महादेवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
कुलदैवतेचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – हिरवा

तुळ
ग्रामदैवतेची पुजा करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – फिकट हिरवा

वृश्चिक
गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक निर्णय जपून घ्यावे. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – नारंगी

धनु
आज कुलदैवतेचे मुळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – पांढरा

मकर
कुलदैवतेचे स्मरण करावे. दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
ओम श्री आदित्याय नम: या मंत्राचा ११ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- निळा

मीन
आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजारांकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader