मेष
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. नमः शिवाय या मंत्राचा जप दिवसभरात तिन्ही प्रहरात करावा.
आजचा रंग – निळा
वृषभ
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणा वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ग्रामदैवतांचे दर्शन घेणे, दान करावे.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी, त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. महादेवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा
कर्क
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गुलाबी
सिंह
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भावंडाच्या गाठी भेटीचे योग. जुने मित्र-मैत्रीण भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा
कन्या
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक आवक चांगली राहील.
आजचा रंग- तपकिरी
तुळ
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा
वृश्चिक
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे. प्रवास जपून करावा. वादविवाद टाळावेत. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – क्रीम
धनु
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील.
आजचा रंग – आकाशी
मकर
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. नोकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. खर्च संभवतो. गणपतीचे स्मरण करावे.
आजचा रंग – पांढरा
कुंभ
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. गुरु मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी
मीन
दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
आजचा रंग – राखाडी
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu