- मेष:-
मानसिक व्यग्रता जाणवेल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलेच्या दृष्टीने अधिक चोखंदळ राहावे. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. आद्योगिक वातावरण चांगले राहील. - वृषभ:-
मनातील इच्छा बोलून दाखवाल. मित्रांच्यात वावराल. किरकोळ खरेदी केली जाईल. दिवस काहीसा आळसात घालवाल. व्यवसायात चांगला आर्थिक लाभ होईल. - मिथुन:-
सामाजिक वजन वाढेल. कामात एकसूत्रता ठेवावी. चंचलतेवर मात करावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. घरातील कामात हातभार लावाल. - कर्क:-
धार्मिक स्थळांना भेट द्याल. मदतीचे समाधान मिळेल. नवीन कल्पना मनात रूजतील. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. - सिंह:-
फार विचार करत बसू नये. अचानक धनलाभ संभवतो. शेअर्स, सट्टा यातून फायदा संभवतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे. कामात आधिक कष्ट घ्यावे लागतील. - कन्या:-
भागीदारीत चांगला लाभ होईल. नातेवाईकांची अडचण समजून घ्याल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. तुमच्यावर नवीन काम सोपवले जाईल. कामाचे कौतुक केले जाईल. - तूळ:-
उगाच कोणाशीही शत्रुत्व घेऊ नका. वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तिखट व तामसी पदार्थ खाल. बोलताना भान राखावे. - वृश्चिक:-
अडचणींवर मात करावी. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्यावे. निराशेला बळी पडू नका. किरकोळ जखमा होऊ शकतात. वाढता खर्च लक्षात घ्यावा. - धनु:-
कामे वेळेवर पूर्ण करावीत. चित्तचांचल्य जाणवेल. योग्य संगतीत राहावे. आर्थिक गुंतवणूक जपून करावी. मित्रांच्या मताचा आदर करावा. - मकर:-
जवळचा प्रवास करावा लागेल. चैनीत दिवस घालवाल. झोपेची तक्रार राहील. आध्यात्मिक बळ वाढवावे. गोष्टी मानाजोग्या घडतील. - कुंभ:-
गोड पदार्थ चाखाल. कामातील बदल लक्षात घ्यावा. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. नवीन ओळखी होतील. बदलांकडे सकारात्मकतेने पाहावे. - मीन:-
मानसिक अस्थिरता जाणवेल. मनातील इच्छेला महत्व द्यावे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहावे. वडीलधाऱ्यांशी सुसंवाद साधावा. कामाला चांगले वळण मिळेल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०२ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 02-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 02 january 2020 aau
Show comments