- मेष:-
अचानक धनलाभ संभवतो. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. खेळ खेळण्यात रममाण व्हाल. मैत्री अधिकार गाजवाल. सल्लामसलत करावी. - वृषभ:-
जोडीदाराच्या निर्णयाचे कौतुक कराल. कौटुंबिक कार्यात मदत कराल. काही अपेक्षांना मुरड घालून पहावी. बागबगीच्याच्या कामाचा आनंद घ्याल. किरकोळ कुरबुरी दूर कराव्यात. - मिथुन:-
बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य लाभेल. कामाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष द्यावे. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. वाचनाची आवड जोपासाल. - कर्क:-
आर्थिक आघाडीवर सुधारणा करता येईल. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळतील. घरात आशादायी वातावरण असेल. भावनेच्या आहारी जावू नका. जाणीवपूर्वक वागाल. - सिंह:-
महत्त्वाचे निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरेल. कौटुंबिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. अधिक उत्साहाने कामे कराल. कामानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात. - कन्या:-
काही वैयक्तिक प्रश्न सामोरे येतील. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सामाजिक वादविवादात अडकू नका. जुनी बिले चुकती कराल. जामिनीचे व्यवहार जपून करावेत. - तूळ:-
ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच कराव्यात. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल. आपले आणि परके यांच्यातील फरक जाणून घ्या. प्रलंबित बिले चुकती कराल. कामे लवकर उरकण्याचा प्रयत्न करावा. - वृश्चिक:-
इतरांबरोबर आनंद वाटून घ्याल. आरोग्यात सुधारणा होईल. गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला घ्यावा. मुलांच्या यशाचा अभिमान वाटेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होईल. - धनु:-
तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्यात. आवडत्या छंदांमध्ये स्वत:ला गुंतवा. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांशी चर्चा करतांना शब्द जपून वापरा. पारमार्थिक उन्नतीचा विचार करावा. - मकर:-
जुन्या गोष्टी उकरुन काढू नयेत. प्रसंगानुरूप वागावे लागेल. आळस झटकून कामाला लागावे. अनावश्यक खर्च टाळावेत. विषय फार ताणू नयेत. - कुंभ:-
जोडीदाराच्या प्रेमळपणात भर पडेल. नवे मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक गोष्टी लाभदायक घडतील. नवीन अधिकाराची चुणूक लागेल. योग्य दर्जा संपादन कराल. - मीन:-
आध्यामिक बाजू सुधाराल. तुमच्या हातून चांगले लिखाण होईल. वैचारिकता सुधार करता येईल. बुद्धीच्या जोरावर कामे मिळवाल. सामाजिक सेवेचे महत्त्व जाणाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 05-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 05 september 2019 aau