- मेष:-
जवळचा प्रवास कराल. हातातील कामाला गती येईल. मानसिक चांचल्या जाणवेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. - वृषभ:-
कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सर्वांशी गोडीने वागाल. अपचनाचा त्रास जाणवेल. योग्य संधीची वाट पहावी. मानसिक स्थैर्य जपावे. - मिथुन:-
एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. जोडीदाराच्या विचारांचे कौतुक कराल. मनातील निराशा दूर सारावी. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका. - कर्क:-
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. नसते साहस करायला जाऊ नका. जुगारातून नुकसान होण्याची शक्यता आहे. चोरांपासून सावध राहावे. - सिंह:-
कौटुंबिक प्रश्न मार्गी लावावेत. तुमचे संपर्क अधिक दृढ होतील. कुशलतेने व्यवहार करावा. मनातून तिरस्कार काढून टाकावा. व्यापारात प्रगती करता येईल. - कन्या:-
भावंडांशी मतभेद संभवतात. हातातील अधिकार योग्यवेळी वापरावेत. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. छुप्या शत्रूंवर विजय मिळवाल. - तूळ:-
आर्थिक व्यवहार जपून करावेत. मौल्यवान वस्तू जपून वापराव्यात. हित शत्रूंचा त्रास संभवतो. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक शांतता जपावी. - वृश्चिक:-
उष्णतेचे त्रास संभवतात. अडचणीतून मार्ग काढावा. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. - धनु:-
सामाजिक बांधीलकी जपावी लागेल. घरात जबाबदारीने वागाल. जुने प्रश्न पुन्हा उभे राहतील. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराचा लाडीक हट्ट पुरवाल. - मकर:-
कामाचे गणित जुळवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. काही बदल स्वीकारावे लागतील. - कुंभ:-
मनातील विचारांना आवर घालावी लागेल. बौद्धिक दिमाख दाखवाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग होईल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. योग्य तर्क बांधावा. - मीन:-
बढतीसाठी प्रयत्न करावेत. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कलेसाठी वेळ काढावा. सर्वांशी हसून-खेळून वागाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा