• मेष:-
    दिवस आळसात घालवाल. घरात तुमचा दबदबा राहील. वैवाहिक सौख्यात भर पडेल. भागीदारीत समाधानी असाल. उत्तम गृहसौख्य लाभेल.
  • वृषभ:-
    उगाच कोणाशीही शत्रूत्व घेवू नका. आरोग्यात सुधारणा होईल. स्त्री वर्गाची मदत घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. कामाचा उरक वाढेल.
  • मिथुन:-
    करमणुकीच्या कार्यक्रमाला जाल. दिवस हसत-खेळत घालवाल. वाढत्या खर्चावर आवर घालावी लागेल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. चांगला धनलाभ होईल.
  • कर्क:-
    मनाची चंचलता बाजूला सारावी. मित्रांचा राग ओढवून घेवू नका. किरकोळ दुखण्यांकडे लक्ष द्यावे. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. आवडीच्या वस्तू खरेदी कराल.
  • सिंह:-
    आरोग्याची काळजी घ्यावी. स्त्री वर्गाशी वाद वाढवू नयेत. झोपेची तक्रार जाणवेल. जवळचा प्रवास मजेत होईल. काटकसर करावी.
  • कन्या:-
    नवीन ओळखीचा फायदा होईल. घरात मोठ्या लोकांचा वावर होईल. चांगला आर्थिक लाभ संभवतो. चोखंदळपणे वागाल. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडेल.
  • तुळ:-
    दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यावसायिक लाभाने खुश असाल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. महत्त्वाकांक्षेने कामे कराल. चुकीच्या गोष्टीत अडकू नका.
  • वृश्चिक:-
    मानसिक स्थैर्य जपावे. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. यात्रेची संधी चालून येईल. वडिलधाऱ्यांचा मान ठेवावा.
  • धनु:-
    गैरसमजाला दूर सारावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. संयम राखावा लागेल. काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. कामात स्त्री वर्गाची मदत घ्याल.
  • मकर:-
    जोडीदाराच्या प्रगतीने खुश व्हाल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. तुमचा लोकसंग्रह वाढेल. गैरसमज टाळावेत. कामानिमित्त दूर गावी जावे लागेल.
  • कुंभ:-
    विरोधकांवर मात करू शकाल. हातातील कामात यश येईल. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. चेष्टा-मस्करी करणे टाळावे. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.
  • मीन:-
    मुलांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. विचार भडकपणे मांडू नयेत. तारतम्यता बाळगावी. कलेला चालना मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader