- मेष:-
प्रवास चांगला होईल. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घालावे. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्वच्छतेवर अधिक भर द्याल. ज्येष्ठांची काळजी घ्यावी. - वृषभ:-
जोमाने कामे हाती घ्याल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची मदत होईल. नवीन मित्र जोडाल. विचार योग्य रीतीने मांडाल. - मिथुन:-
मानसिक स्थैर्य जपावे. स्मरणशक्तीचा योग्य वापर कराल. हजरजबाबीपणा दर्शवाल. कौटुंबिक प्रश्न हाताळाल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. - कर्क:-
हौस पूर्ण करण्याकडे लक्ष राहील. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. उत्साहाच्या भारत कामे हाती घेतांना विचार करावा. कामाची दगदग जाणवेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. - सिंह:-
सामाजिक जाणीवेपोटी कामे हातात घेतांना सारासार विचार करावा. काही गोष्टी उघडपणे बोलू नयेत. चुकीच्या कल्पना मनात बाळगू नका. क्षणिक सौख्य जपावे. मानसिक चंचलता जाणवेल. - कन्या:-
मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. स्त्रीवर्गाची मदत मिळेल. कामात आळस करू नये. सुखासक्तपणा जाणवेल. कल्पकता दाखवता येईल. - तुळ:-
तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. व्यावसायिक गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे. कामाचे स्वरूप नीट समजून घ्यावे. प्रवासाची आवड पूर्ण कराल. खटपट करून कामे कराल. - वृश्चिक:-
वडिलधाऱ्यांचा योग्य तो मान राखावा. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात. उपासनेकडे लक्ष द्यावे. कामात हयगय नको. विशाल दृष्टीकोन ठेवावा. - धनु:-
काही कामे चटकन पार पडतील. अचानक धनलाभाची शक्यता. जवळच्या व्यक्तींशी होणारे गैरसमज टाळावेत. संयम बाळगावा. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. - मकर:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. टोकाचा विचार करू नका. मतभिन्नता दर्शवू नका. भागीदारीत संयमाने वागावे. - कुंभ:-
कामातून आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी योग्य तो मान मिळेल. नोकरचाकरांचे सौख्य लाभेल. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. - मीन:-खेळकरपणा दाखवाल. सर्वांच्या आनंदात मिसळून जाल. मुलांच्या स्वतंत्रवृत्तीचा आदर करावा. प्रेमसौख्यात नाराजी नको. नवीन मित्र जोडाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, गुरूवार, १ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 01-08-2019 at 05:30 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 1 august