• मेष:-
    प्रवास चांगला होईल. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घालावे. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्वच्छतेवर अधिक भर द्याल. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
  • वृषभ:-
    जोमाने कामे हाती घ्याल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची मदत होईल. नवीन मित्र जोडाल. विचार योग्य रीतीने मांडाल.
  • मिथुन:-
    मानसिक स्थैर्य जपावे. स्मरणशक्तीचा योग्य वापर कराल. हजरजबाबीपणा दर्शवाल. कौटुंबिक प्रश्न हाताळाल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.
  • कर्क:-
    हौस पूर्ण करण्याकडे लक्ष राहील. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. उत्साहाच्या भारत कामे हाती घेतांना विचार करावा. कामाची दगदग जाणवेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.
  • सिंह:-
    सामाजिक जाणीवेपोटी कामे हातात घेतांना सारासार विचार करावा. काही गोष्टी उघडपणे बोलू नयेत. चुकीच्या कल्पना मनात बाळगू नका. क्षणिक सौख्य जपावे. मानसिक चंचलता जाणवेल.
  • कन्या:-
    मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. स्त्रीवर्गाची मदत मिळेल. कामात आळस करू नये. सुखासक्तपणा जाणवेल. कल्पकता दाखवता येईल.
  • तुळ:-
    तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. व्यावसायिक गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे. कामाचे स्वरूप नीट समजून घ्यावे. प्रवासाची आवड पूर्ण कराल. खटपट करून कामे कराल.
  • वृश्चिक:-
    वडिलधाऱ्यांचा योग्य तो मान राखावा. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात. उपासनेकडे लक्ष द्यावे. कामात हयगय नको. विशाल दृष्टीकोन ठेवावा.
  • धनु:-
    काही कामे चटकन पार पडतील. अचानक धनलाभाची शक्यता. जवळच्या व्यक्तींशी होणारे गैरसमज टाळावेत. संयम बाळगावा. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील.
  • मकर:-
    उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. टोकाचा विचार करू नका. मतभिन्नता दर्शवू नका. भागीदारीत संयमाने वागावे.
  • कुंभ:-
    कामातून आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी योग्य तो मान मिळेल. नोकरचाकरांचे सौख्य लाभेल. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.
  • मीन:-खेळकरपणा दाखवाल. सर्वांच्या आनंदात मिसळून जाल. मुलांच्या स्वतंत्रवृत्तीचा आदर करावा. प्रेमसौख्यात नाराजी नको. नवीन मित्र जोडाल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 1 august