- मेष:-
उत्तम आर्थिक लाभ संभवतो. जवळचे मित्र भेटतील. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. स्त्री समुहात वावराल. पोटाच्या विकारांवर वेळीच उपचार करावा. - वृषभ:-
सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कामात स्थिरता ठेवावी. तुमच्या कामाच्या पध्दतीचे कौतुक केले जाईल. कामानिमित्त प्रवास घडून येईल. - मिथुन:-
धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक बांधिलकी जपाल. शैक्षणिक कामात यश येईल. कल्पनाशक्तिला चांगला वव मिळेल. बौध्दिक चुणूक दाखवाल. - कर्क:-
मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चुकीच्या कामात हात घालू नका. काही गोष्टी आकस्मिक घडतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. - सिंह:-
दिलेल्या पैशांची वसूली होईल. काही आर्थिक अडचणी सुटतील. हातातीलकलेचे कौतूक केले जाईल. भांडणात अडकू नये. प्रवासाचा आनंद लुटावा. - कन्या:-
दगदग वाढण्याची शक्यता आहे. कामात उत्साह जाणवेल. गैरसमज वाढू देऊ नका. शाब्दिक चकमक टाळण्याचा प्रयत्न करावा. अडथळ्यातून मार्ग काढावा. - तूळ:-
गैरसमजूतीतून वाद वाढू देऊ नका. मानसिक स्वास्थ्य जपावं. डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. खर्च वाढू शकतो. जून्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. - वृश्र्चिक:-
घरातील कामांना वेगळा वेळ काढाल. दस्तऐवज तपासून घ्यावेत. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दानधर्म केला जाईल. घरी मोठ्या लोकांची उठबस राहिल. - धनू:-
जोडीदाराची प्रगती होईल. नवीन मित्र भेटतील. तुमच्या मताशी सहमती दर्शवली जाईल. प्रवास मजेत होईल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे. - मकर:-
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक सुबत्ता लाभेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. बढतीची चिन्हे दिसतील. विवाह जुळून येतील. - कुंभ:-
इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. दिवस मजेत व्यतीत कराल. कामाचे प्रशस्ती पत्रक मिळेल. काही अपवादांकडे दुर्लक्ष करावे. दर्जेदार काम करण्यावर भर द्यावा. - मीन:-
औद्योगिक बदल समजून घ्यावेत. मानापमान फार मनावर घेऊ नयेत. जमिनीच्या कामातून फायदा संभवतो. मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. चुकीचे अर्थ काढत बसू नका.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, गुरुवार, १० ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 10-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 10 october 2019 aau