- मेष:-
आळसाने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामात स्त्रियांची मदत होईल. चांगले व्यावसायिक लाभ संभवतात. सुखासक्तपणा जाणवेल. - वृषभ:-
कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. कामाच्या ठिकाणी दर्जा सुधाराल. व्यापारी लोकांना चांगला फायदा संभवतो. नवीन कल्पना मनात रुळतील. आळस दूर सारावा. - मिथुन:-
आध्यात्मिक गोष्टींची आवड जोपासाल. उपासनेत प्रगती करता येईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जवळचा प्रवास कराल. हिंमतीने कामे करता येतील. - कर्क:-
उधळेपणा करू नये. मागचापुढचा विचार करून निर्णय घ्याल. अनपेक्षितपणे जबाबदारी येवून पडेल. स्नायू धरणे यांसारखे विकार त्रासदायक ठरू शकतात. कामातील दिरंगाई दूर करावी. - सिंह:-
कामाची दगदग वाढू शकते. मानापमानाचे प्रसंग नजरेआड करावेत. अंगात उत्साह येईल. कामाच्या ठिकाणी प्रतिकूलता जाणवू शकते. अंगीकृत कार्यातील अडचणी दूर कराव्यात. - कन्या:-
खर्च वाढू शकतात. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. पायाचे त्रास होवू शकतात. आर्थिक बाबींवर सतर्कता बाळगावी. - तूळ:-
पैसे मिळविण्याची प्रबळ इच्छा मनात धरून ठेवाल. काही गोष्टी गुप्तपणे कराल. डोळ्यांची तपासणी योग्यवेळी करून घ्यावी. मनातील संशय दूर करावा. चुकीच्या कल्पनांना मनात घर करून देवू नका. - वृश्चिक:-
घरगुती वातावरणात रमून जाल. ज्येष्ठ मंडळींचा सहवास मिळेल. प्रेमळपणे सर्वांना आपलेसे कराल. घरगुती कामाचा ताण जाणवेल. गृह्सौख्याचा सर्वाधिक विचार कराल. - धनु:-
जवळचा प्रवास कराल. भावंडाना मदत कराल. स्वभावातील लहरीपणा दूर सारावा लागेल. एकलकोंडेपणा बाजूला सारून नवीन मित्र जोडावेत. काहीसा विसरभोळेपणा जाणवू शकतो. - मकर:-
आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात जोडीदाराची उत्तम मदत मिळेल. मनाजोगी खरेदी कराल. शांतपणे आपले मत मांडाल. - कुंभ:-
इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. पोटाची काळजी घ्यावी. वातजन्य पदार्थ खाण्याचे टाळावे. घाईघाईने कामे करणे चुकीचे ठरेल. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे. - मीन:-
मानसिक स्थैर्य जपावे. एकांगी विचार करू नका. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. भावनेच्या आहारी जावू नये.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 12 september 2019 aau