- मेष:-
सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वारंवार मानसिक बदल होतील. कष्टाचे चीज होईल. कौतुकास पात्र व्हाल. - वृषभ:-
नातेवाईकांशी होणारे मतभेद टाळावेत. काही कामात निरुत्साह जाणवेल. घरात शांतता राखावी. धार्मिक कामात सहभाग घ्याल. सामाजिक सेवेची जाणीव ठेवाल. - मिथुन:-
घरगुती खर्च आटोक्यात ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. जबाबदारी यथाशक्ती पार पाडाल. मनाजोगी खरेदी करता येईल. चौकसपणे विचार कराल. - कर्क:-
पैसा खर्च करतांना मागचापुढचा विचार करावा. जबाबदारीची जाणीव ठेवा. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल. हुरळून जावू नका. - सिंह:-
दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. अडथळे यशस्वीपणे पार कराल. खर्च करतांना विचार करावा. कामात उत्साह जाणवेल. स्वतंत्र विचार मांडाल. - कन्या:-
सामुदाईक वादापासून दूर राहावे. त्वचेचे विकार संभवतात. काही गोष्टीत अडकून पडाल. रेस, जुगार यांतून फायदा संभवतो. कलेचा आस्वाद घ्याल. - तुळ:-
सतत खटपट करत राहाल. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. व्यावसायिक यशाकडे पाऊल टाकाल. आर्थिक मान सुधारता येईल. - वृश्चिक:-
काही अनपेक्षित बदल संभवतात. अविचाराने निर्णय घेवू नयेत. इर्षेने कामे कराल. वरिष्ठांच्या शब्दाचा योग्य मान ठेवावा. वादात अडकू नका. - धनु:-
स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तडकाफडकी निर्णय घ्यावू नयेत. शक्तीची उपासना करावी. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. संसर्गजन्य आजारांपासून दूर राहावे. - मकर:-
भागीदारीतून चांगला लाभ संभवतो. व्यवहार कुशलता ठेवाल. दिवस मनासारखा व्यतीत करता येईल. भागीदारीत पुढचे पाऊल टाकाल. प्रेमसौख्यात अहंकाराला थारा देवू नका. - कुंभ:-
इतरांचा विश्वास संपादन करावा. भांडणातून वितुष्ट निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. मतवैचित्र्य दर्शवू नका. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. त्वचेचे विकार संभवतात. - मीन:-
अध्यात्माकडे ओढ वाढेल. परोपकाराचे महत्व जाणाल. उष्णतेचे विकार जाणवतील. गोड बोलून कामे साध्य कराल. समाजसेवेत संतुष्ट असाल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 15-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 15 august 2019 aau