मेष

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये बढतीचे, पगार वाढीचे योग आहेत. नवीन आवडत्या कामांचा प्रयत्न करुन पाहण्यास दिवस चांगला आहे. दत्त मंदिरामध्ये फुले अर्पण करावीत.
आजचा रंग- पिवळा

वृषभ

मिथुन राशीतील चंद्रभ्रमणामुळे आर्थिक लाभांचे प्रमाण वाढेल. धन योग सुधारतील परंतु त्याचे नियोजन उत्तमरित्या करावे. ओम नमो नारायण ह्या मंत्राचे नामस्मरण दिवसभर करावे.
आजचा रंग- हिरवा

मिथुन

मिथुन राशीतील चंद्रभ्रमणामुळे आर्थिक योजना पूर्णत्वास नेण्यास दिवस चांगला आहे. गुरू चिंतनात दिवस घालवावा.
आजचा रंग-पिवळा

कर्क

साधारण दिवस. वैयक्तिक कामे करण्यात वेळ जाण्याची शक्यता आहे. जबाबदारी पार पाडताना कायदेशीर विचार करावा. दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे.
आजचा रंग- तेजस्वी पिवळा

सिंह

आर्थिक कामांसाठी पाठपुरावा करावा. जुन्या योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आजचा दिवस शुभ असेल. ओम नमः शिवाय आणि गुरुमंत्राचा जप करावा.
आजचा रंग- तपकिरी

कन्या

बढतीचे प्रयत्न करण्यासाठी, बदलीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज केलेल्या प्रयत्नांना पुढे यश मिळू शकते. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- जांभळा

तुळ

स्थितीला भुरळून न जाता कामांवर लक्ष केंद्रित करावे. योग्य संधी उपलब्ध होतील. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे दान करावे.
आजचा रंग- जांभळा

वृश्चिक

आजचा दिवस जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा असेल. कदाचित मित्रांना सहकार्य करावे लागेल. स्वतः मदत करावी. ओम श्री आदि गुरवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

धनु

व्यावसायिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल. ज्येष्ठांशी सुसंवाद साधाल. गृह सौख्य लाभेल. ओम द्रां दत्तात्रयाय नमः ह्या मंत्राचा एक माळ जप करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नारंगी

मकर

आज व्यवसायांमध्ये सहकाऱ्यांचे मन वडीलधाऱ्यांप्रमाणे सांभाळावे. विनाकारण वादविवाद टाळावेत. दत्त मंदिरामध्ये तांदूळ अर्पण करावेत.
आजचा रंग- पिवळा

कुंभ

काल प्रमाणेच आजचा दिवसही कुंभ राशीच्या व्यक्तींना उत्तम यश, संधी घेऊन येणारा आहे. कर्ज प्रकरणे, परदेश गमनाचे प्रयत्न, व्हिसाचे प्रयत्न, नोकरीत बढतीचे प्रयत्न केल्यास यश प्राप्ती होऊ शकते. ओम राहवे नमः आणि श्री गुरुदेव दत्त हे जप करावेत.
आजचा रंग – राखाडी

मीन

गुरुबळामुळे हा दिवस तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आखू शकता. हा दिवस प्रभुत्वाचा ठरेल. इतके चांगले योग आहेत. व्यावसायिकांना नवे प्रकल्प मिळण्याचे योग आहेत. येणाऱ्या सर्व संधीचा फायदा घ्यावा. दत्त मंदिरामध्ये साखर, फुटाणे, गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवणे
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu