- मेष:-
कौटुंबिक कामे वाढतील. आपली जबाबदारी समर्थपणे उचलाल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. सर्वांना प्रेमळपणे जवळ कराल. कौटुंबिक विचार सर्वात आधी कराल. - वृषभ:-
दिवस प्रसन्नतेत उगवेल. मनाजोग्या गोष्टी करता येतील. भावंडांच्या गाठीभेटी होतील. गृहिणींना कर्तेपणाचा मान मिळेल. सर्वांकडून कौतुकास पात्र व्हाल. - मिथुन:-
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. पारमार्थिक उन्नती कराल. यात्रेचे योग येतील. - कर्क:-
उत्कृष्ट व्यावसायिक लाभ संभवतो. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल. दिवस भारावलेला असेल. मनात नवीन योजना आखल्या जातील. - सिंह:-
तुमचे सामाजिक वजन वाढेल. व्यापारी लोकांना चांगला फायदा संभवतो. घरगुती कामासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. कामाच्या स्वरुपात सारखे बदल करू नका. - कन्या:-
तुमची बौद्धिक बाजू सुधारेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. चांगले स्वप्न पडेल. धार्मिक कामात सह्भाग नोंदवाल. - तूळ:-
मानसिक चांचल्य जाणवेल. शेअर्स मधून फायदा संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. आकस्मिकतेने चलबिचल होवू नका. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी. - वृश्चिक:-
तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. कामातील खाचाखोचा जाणून घ्याल. तुमचा ऐहिक दर्जा वाढेल. घरात शुभकार्य घडेल. आर्थिक मान सुधारता येईल. - धनु:-
नातेवाईकांच्या गोतावळ्यात रमाल. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पार पडतील. काही वेळेस अपेक्षाभंग होवू शकतो. आध्यात्मिक प्रगती करता येईल. अडचणीतून योग्य मार्ग काढाल. - मकर:-
मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. बैठे खेळ खेळाल. रेस, जुगार यातून फायदा संभवतो. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळेल. - कुंभ:-
घरातील वातावरण प्रसन्न असेल. आवडत्या गोष्टी करायला मिळतील. बागकामाची आवड जोपासाल. जवळचे मित्र भेटतील. छान मौजमजेत दिवस जाईल. - मीन:-
जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास मिळेल. कामाला चांगली गती येईल. अंगीभूत कलेला वाव द्यावा. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, गुरुवार, १७ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 17-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 17 october 2019 aau
Show comments