- मेष:-
उत्साहाच्या भरात चुकीचा निर्णय घेवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्या मनाजोगा व्यतीत कराल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा. - वृषभ:-
मानसिक चंचलता जाणवेल. कलेला अधिक प्राधान्य द्याल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अकारण वाटणारी भीती दूर करा. विसर-भोळेपणाचा त्रास जाणवू शकतो. - मिथुन:-
घरातील गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. मनातील इच्छा पूर्ण होतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. संभाषणाची आवड जोपासाल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमेल. - कर्क:-
चौकसपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. चुकीचा तर्क करू नका. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांची मदत घ्यावी. लहान व्यवसायिकांना फायदा संभवतो. - सिंह:-
न डगमगता मत मांडा. आर्थिक स्थैर्याचा दुसरा मार्ग शोधावा. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. हसत खेळत कामे कराल. मिळणाऱ्या कमिशनकडे लक्ष द्यावे. - कन्या:-
अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल. तुमचा अंदाज योग्य ठरेल. धूर्तपणे वागाल. आपले विचार योग्य रीतीने मांडाल. कोणतीही गोष्ट लवकर समजून घ्याल. - तूळ:-
खोटे बोलणे टाळावे. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याल. प्रवासाची आवड जोपासाल. बनवा-बनवी करू नका. सामाजिक बांधिलकी ठेवावी. - वृश्चिक:-
ओळखीचा फायदा होईल. गप्पांमधून आपले काम साध्य कराल. अधिकारी व्यक्तींचे मत विचारात घ्यावे. तरुणांशी मैत्री कराल. कामात स्त्री वर्गाचे सहाय्य घ्याल. - धनु:-
तुमच्यातील हर-हुन्नरीपणा दाखवून द्यावा. व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल. पत्रकारांना काही अधिकार हातात येतील. व्यवसायात उत्कृष्ट नफा होईल. - मकर:-
चांगले साहित्य वाचाल. कामाचे सखोल ज्ञान मिळवाल. मधुर वाणीने सर्वाना प्रभावित कराल. शिस्तीचा बडगा करू नका. प्रवासाची आवड जोपासाल. - कुंभ:-
भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मनात नसतांना सुद्धा प्रवास करावा लागेल. कामात आळस करू नका. पत्नीच्या विचाराला प्राधान्य द्यावे. चिकाटी सोडून चालणार नाही. - मीन:-
जोडीदाराची व्यवहार कुशलता लक्षात येईल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्यावर जोडीदाराच्या मताचा प्रभाव राहील. काही कामे दिरंगाईने होतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, गुरुवार, १९ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 19-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 19 september 2019 aau