- मेष:-
जवळचे नातेवाईक भेटतील. मित्रमंडळींच्या सहवासात रमाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार करावा. रागाला आवर घालावा. - वृषभ:-
भावंडांच्या सहवासात खुश असाल. आवडते साहित्य वाचायला मिळेल. छोटा प्रवास मजेत होईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. - मिथुन:-
गायन कलेची आवड जोपासाल. अधिकारवाणीने बोलाल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. तुमच्यातील उर्जेचा योग्य वापर करावा. नवीन अधिकारांचा वापर कराल. - कर्क:-
उत्कृष्ठ तर्कपद्धती वापराल. जास्त चिकित्सा करू नका. आपले मत योग्यरीतीने मांडाल. भावनेच्या आहारी जावू नका. मित्रांच्या रागाला सामोरे जावे लागेल. - सिंह:-
हेकेखोरपणा करू नका. कामातील अडथळे दूर करावेत. पित्ताचा त्रास जाणवेल. चिडचिड करू नका. वादात अडकू नका. - कन्या:-
लहान मुलांशी मैत्री कराल. गप्पांमधून जवळीक वाढवाल. पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. आवाक्याबाहेरील खर्च टाळावेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. - तुळ:-
जोडीदाराचे प्रभुत्व राहील. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. जमिनीच्या कामात लक्ष घालाल. - वृश्चिक:-
तुमच्या बोलण्यावर इतर खुश होतील. धोरणीपणाने वागाल. निसर्गरम्य वातावरणात रमाल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. - धनु:-
कफविकाराचा त्रास जाणवेल. अतिविचार करू नयेत. तुमच्या अनुमानाला निश्चिती येईल. रेस, जुगार यांतून फायदा संभवतो. करमणुकीच्या कार्यक्रमात रमाल. - मकर:-
पत्नीच्या बुद्धिमत्तेचे कौतुक कराल. व्यवहारकुशलता दर्शवाल. कामाचा ताणामुळे दुरावा वाढवू शकतो. घरातील वातावरणात रमून जाल. चांगले वाहन सौख्य लाभेल. - कुंभ:-
विश्वासास पात्र व्हावे. खोट्याचा आधार घेवू नका. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. कामाची धावपळ राहील. मनाची संवेदनशीलता दाखवाल. - मीन:-
कौटुंबिक प्रभुत्व दाखवाल. अभ्यासू दृष्टीकोन ठेवाल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
आजचे राशीभविष्य, गुरुवार, २२ ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 22-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 22 august 2019 aau