मेष

प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. कन्या राशीतला चंद्र फारसा प्रगतीकारण नाही. दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज भाग्यकारक दिवस असणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करणे. आर्थिक येणे, कोर्ट, बॅंक या कामांसाठी भेटी गाठी कराव्यात, कामे मार्गी लागतील. दत्त मंदिरात पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
आजचा रंग- राखाडी

मिथुन

आनंददायक दिवस, बऱ्याच दिवसांनी सर्वांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. दैनंदिन कामातही अनेकांचे सहकार्य लाभेल. आज योजलेल्या कामांत भविष्यात चांगली प्रगती होऊ शकेल. ओम द्रां द्री दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

चंद्राच्या कन्या राशीतील भ्रमणामुळे जुनी येणी येण्यास मदत होईल. कर्ज प्रकरणे, कोर्ट केस यांचा पाठपुरावा केल्यास भविष्यात फायदा होईल. ओम द्रां द्री दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग- नारंगी

सिंह

आज कन्येचा चंद्र राशीला नवीन संधी उपलब्ध करुन देणारा आहे. नवीन आर्थिक धोरणे राबवाल. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने योग्य दिवस आहे. ओम शांभवे नमः जप करणे.
आजचा रंग- निळा

कन्या

चंद्राचे भ्रमण कन्या राशीतून असणार आहे. योग्य नियोजनाने मोठे निर्णय सहज मार्गी लावू शकाल. अडचणींवर मात करू शकाल, विजयी ग्रहदशा आहे.
आजचा रंग – नारंगी

तुळ

आज बॅंक कोर्ट कामात वेळ जाऊ शकतो. मनावर ताण न घेता दिवस घालावा. मित्र मंडळींना वेळ द्याल. आप्तेष्टांशी, पत्नीशी जमवून घ्या. तुमच्या पुढाकाराने संबंध सुरळीत राहतील. दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा २१ वेळा जप करणे.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

आर्थिक आवक चांगली राहील. भुसार माल कमोडिटी मार्केट, शेअर्स बाजारासाठी उत्तम दिवस आहे. गृहिणींना आनंददायी दिवस आहे. विद्यार्थ्यांसाठी यशदायी दिवस आहे. ओम श्री दत्तात्रयाय नमः जप करावा.
आजचा रंग – निळा

धनु

आज दिवसभर चंद्राचे भ्रमण कन्या राशीत असणार आहे. नोकरी व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.
आजचा रंग – निळा

मकर

आज संपूर्ण दिवस चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. सर्व कामांसाठी दिवस शुभ आहे. आर्थिक स्थिर-स्थावरतेसाठी योग्य दिवस. दिवसाचे पूर्ण नियोजन करावे. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करणे.
आजचा रंग – राखाडी

कुंभ

संपूर्ण दिवस चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. मोठे निर्णय टाळावे. आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास टाळावेत, एकंदर आजचा दिवस साधारण आहे. लक्ष्मी अष्टकाचे पाठ करणे.
आजचा रंग – निळा

मीन

नोकरीमध्ये सुसंधी, बढती आणि बदलीसाठी प्रयत्न करावेत. नवीन नोकरीचे नवीन योग आहेत. प्रवास जपून करावा. ओम द्रां दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Story img Loader