मेष:-रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल. आवडत्या साहित्यात रमून जाल. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल.

वृषभ:-स्वछंदीपणे दिवस घालवाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल. घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल.

मिथुन:-घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात. कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल.

कर्क:-कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल. पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका.

सिंह:-दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल. कमीपणा घ्यायला घाबरू नका. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. नवीन मित्र जोडले जातील.

कन्या:-विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कामाची योग्य दिशा ठरवा. कल्पनेत रमून जाऊ नका. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. बोलतांना तारतम्य बाळगा.

तूळ:-चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल.

वृश्चिक:-नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कर्तुत्वाला वाव देता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल.

धनू:-तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा. सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल.

मकर:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे. काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ:-अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मतभेद संभवतात. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.

मीन:-आततायीपणे वागून चालणार नाही. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. हातातील कलागुण विकसित करावेत.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader