मेष
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – राखाडी
वृषभ
ओम नमो नारायण या मंत्राचे नामस्मरण दिवसभर करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पांढरा
मिथुन
गुरू चिंतनामध्ये आजचा दिवस घालवावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. कौटुंबीक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – नारंगी
कर्क
दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – निळा
सिंह
आज ओम नम: शिवाय आणि गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – राखाडी
कन्या
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी
तुळ
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढऱ्या वस्तू दान करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठी निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – राखाडी
वृश्चिक
ओम श्रीं आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना. सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा
धनु
ओम द्रा दत्तात्रयाय नम: या मंत्राची एक माळ जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी
मकर
दत्त मंदिरात आज तांदूळ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबीक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – मोरपंखी
कुंभ
ओम राहवे नम: आणि श्री गुरूदेव दत्त हे जप करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- पांढरा
मीन
दत्त मंदिरात साखर, फुटाणे, गुळ, खोबऱ्याचा नेवैयद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहेत. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबीक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – राखाडी
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu