मेष:- इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. दानाचे महत्व समजावून सांगाल. धार्मिक बाजू सुधाराल. सर्वांचे आनंदाने कराल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. वृषभ:- धार्मिक ग्रंथ वाचावेत. फार चर्चा करत बसू नका. मनातील अकारण असणारी भीती बाजूला सारावी. जोडीदाराला समजून घ्यावे. योग्य वेळेची वाट पाहावी. मिथुन:- कसलीही घाई करू नका. कामाचा आनंद मिळेल. तुमच्या मताला महत्व प्राप्त होईल. विरोधकांवर मात करता येईल. विचारांना योग्य चालना द्यावी. कर्क:- फसवेगिरीपासून दूर राहावे. जोडीदाराचा समजूतदारपणा दिसून येईल. आरोग्यात सुधारणा होईल. त्वचाविकार बळावू शकतात. भावनेच्या आहारी जाऊ नका. सिंह:- नातेवाईकांशी दुरावा वाढू शकतो. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. कामाचा गोंधळ उडेल. मानसिक दोलायमानता जाणवेल. कन्या:- गप्पांच्या ओघात वाहून जाऊ नका. कौटुंबिक सौख्याचा विचार आधी करावा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. जवळचा प्रवास करावा लागेल. तूळ:- खर्चाचे प्रमाण वाढू शकते. संपर्कातील लोकांशी सलोख्याने वागावे. तिखट पदार्थांवर ताव माराल. भावंडांची काळजी लागून राहील. घरासाठी काही खरेदी केली जाईल. वृश्चिक:- कौटुंबिक प्रश्न सामोरे येतील. जबाबदारीत अधिक वाढ होईल. थोडे अधिक श्रम पडतील. रागावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक प्रश्न भेडसावेल. धनु:- चालू कामात खोळंबा येऊ शकतो. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक प्रगतीचा विचार करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मकर:- वैवाहिक सौख्य वाढेल. सामुदायिकबाबीत सतर्कता दाखवावी. घराबाहेर वावरतांना सावध राहावे. आरोग्याची वेळेवर तपासणी करावी. मानसिक स्थैर्य जपावे. कुंभ:- कामात काही बदल करावे लागतील. अपेक्षित लाभावर लक्ष केंद्रित होईल. मनातील इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष लागून राहील. अधिकाऱ्यांशी आदराने वागावे. नवीन मित्र जोडावेत. मीन:- कामावर विशेष लक्ष केंद्रित करावे. मनाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. तुमच्या ज्ञानात अधिक भर पडेल. मानाजोगी खरेदी करता येईल. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर