- मेष:-
मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. फार काळजी करत राहू नका. प्रवासात काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची मदत होईल. - वृषभ:-
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील. स्त्रियांशी मैत्री वाढेल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल. - मिथुन:-
कलेतून नावलौकिक वाढेल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण लाभेल. घरातील साफसफाई काढाल. नीटनेटकेपणाकडे अधिक लक्ष द्याल. - कर्क:-
काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. अपयशाने खचून जाऊ नये. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. अतिविचार करू नका. - सिंह:-
जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. तिरसटपणे वागू नये. बौद्धिक चुणूक दाखवता येईल. व्यापारी वर्गाला नवीन आशादायी वातावरण लाभेल. नवीन लोक संपर्कात येतील. - कन्या:-
कफविकार बळावू शकतात. कामाच्या ठिकाणी समाधान शोधाल. वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे. - तूळ:-
तुमची इच्छाशक्ती वाढीस लागेल. साहसाने कामे हाती घ्याल. लिखाणाला बळ मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसून येईल. - वृश्चिक:-
सांपत्तिक स्थिती सुधारेल. खर्च वाढू शकतो. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. - धनु:-
प्रचंड आशावादी दृष्टिकोन ठेवाल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. स्वत:च मान राखण्याचा प्रयत्न कराल. दिलदारपणे वागाल. - मकर:-
सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. पारमार्थिक उन्नती साधता येईल. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. सामाजिक सेवेत हातभार लावावा. - कुंभ:-
मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे. काटकसर करण्याकडे कल राहील. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवाल. आवडी-निवडीवर भर द्याल. - मीन:-
आवडत्या गोष्टी कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. स्वच्छंदीपणे वागाल.या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदेहजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजचे राशीभविष्य, गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 27-02-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 27 february 2020 aau