मेष
ओम अदभ्यौ नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – आकाशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ
ओम आदि गुरूवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीमध्ये असेल. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – निळा

मिथुन
ओम राम दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – करडा

कर्क
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – नारंगी

सिंह
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीमध्ये असेल. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – जांभळा

कन्या
श्री दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – हिरवा

तुळ
दत्त मंदिरामध्ये निशिगंधाची फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीमध्ये असेल. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक
दत्त मंदिरामध्ये पांढऱ्या पदार्थांचे अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – गुलाबी

धनु
श्री भानवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान. सामाजिक प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना रावबू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – लाल

मकर
ओम अतिद्रैयाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – निळा

कुंभ
ओम राहवे नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. मोठी आर्थिक उलाढल करू नये. प्रवास जपून करावेत. आजाराकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

मीन
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण १०.२३ नंतर कन्या राशीत असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 27 july