• मेष:-
    स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. चुकीच्या कामात लक्ष घालू नका. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. अचानक धनप्राप्ती संभवते. ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी.
  • वृषभ:-
    वैवाहिक सौख्य जपावे. वादाचे मुद्दे उकरुन काढू नयेत. मुलांचे विचार विरोधी असू शकतात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. अपचनाचा त्रास जाणवेल.
  • मिथुन:-
    मानसिक सौख्य जपावे. कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नये. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. चंचलता बाजूला सारावी लागेल. उगाच नावे ठेवत बसू नये.
  • कर्क:-
    गोष्टी नीट समजून घ्याव्यात. स्वच्छंदीपणे वागाल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात प्राविण्य दाखवाल.
  • सिंह:-
    उत्तम गृहसौख्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. काही कामे दिरंगाईने होतील. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल.
  • कन्या:-
    भावंडांची जबाबदारी घ्याल. मानसिक चांचल्य जाणवेल. सर्व गोष्टी व्यवस्थित जाणून घ्याव्यात. विविध विषयांमध्ये रुची दाखवाल. बौद्धिक छंद जोपासाल.
  • तूळ:-
    व्यापारात चांगला फायदा संभवतो. गोड पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. योग्य पथ्ये पाळावीत. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. चांगला आर्थिक लाभ संभवतो.
  • वृश्चिक:-
    आरोग्यात सुधारणा होईल. बौद्धिक चलाखी दाखवाल. जबाबदारीने कामे पार पडाल. कामाचा ताण जाणवेल. कामात वेळेला महत्व द्यावे.
  • धनु:-
    उगाचच काळजी लागून राहील. मानसिक व्यग्रता जाणवेल. नवीन विचारांची जोड घ्यावी. छुप्या शत्रूंचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक सौख्यात वाढ होईल.
  • मकर:-
    मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. कामात स्त्रीवर्गाची मदत होईल. सुखासक्तपणा जाणवेल. व्यवसायात चांगला लाभ होईल. स्त्री समुहात वावराल.
  • कुंभ:-
    सामाजिक वजन वाढेल. चारचौघात कौतुक केले जाईल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक कामात हातभार लावाल. अधिकारी व्यक्तींची ओळख वाढेल.
  • मीन:-
    धार्मिक कामे आवडीने कराल. तीर्थ यात्रा करण्याचा योग्य येईल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर