- मेष:-
स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. चुकीच्या कामात लक्ष घालू नका. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. अचानक धनप्राप्ती संभवते. ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. - वृषभ:-
वैवाहिक सौख्य जपावे. वादाचे मुद्दे उकरुन काढू नयेत. मुलांचे विचार विरोधी असू शकतात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. अपचनाचा त्रास जाणवेल. - मिथुन:-
मानसिक सौख्य जपावे. कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नये. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. चंचलता बाजूला सारावी लागेल. उगाच नावे ठेवत बसू नये. - कर्क:-
गोष्टी नीट समजून घ्याव्यात. स्वच्छंदीपणे वागाल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात प्राविण्य दाखवाल. - सिंह:-
उत्तम गृहसौख्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. काही कामे दिरंगाईने होतील. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. - कन्या:-
भावंडांची जबाबदारी घ्याल. मानसिक चांचल्य जाणवेल. सर्व गोष्टी व्यवस्थित जाणून घ्याव्यात. विविध विषयांमध्ये रुची दाखवाल. बौद्धिक छंद जोपासाल. - तूळ:-
व्यापारात चांगला फायदा संभवतो. गोड पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. योग्य पथ्ये पाळावीत. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. चांगला आर्थिक लाभ संभवतो. - वृश्चिक:-
आरोग्यात सुधारणा होईल. बौद्धिक चलाखी दाखवाल. जबाबदारीने कामे पार पडाल. कामाचा ताण जाणवेल. कामात वेळेला महत्व द्यावे. - धनु:-
उगाचच काळजी लागून राहील. मानसिक व्यग्रता जाणवेल. नवीन विचारांची जोड घ्यावी. छुप्या शत्रूंचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. - मकर:-
मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. कामात स्त्रीवर्गाची मदत होईल. सुखासक्तपणा जाणवेल. व्यवसायात चांगला लाभ होईल. स्त्री समुहात वावराल. - कुंभ:-
सामाजिक वजन वाढेल. चारचौघात कौतुक केले जाईल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक कामात हातभार लावाल. अधिकारी व्यक्तींची ओळख वाढेल. - मीन:-
धार्मिक कामे आवडीने कराल. तीर्थ यात्रा करण्याचा योग्य येईल. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 28-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 28 november 2019 aau