• मेष:-
    काही गोष्टींबाबत तोल ढळणार नाही याची काळजी घ्यावी. करमणूकप्रधान कार्यक्रम बघाल. खेळत मन रमेल. मन:शांती लाभेल. घरातील टापटीपीवर भर द्याल.
  • वृषभ:-
    प्रवास मजेत होईल. संवेदनशीलपणे विचार कराल. सर्व माहिती नीट समजून घ्याल. स्वभावातील लहरीपणा दूर सारावा. नवीन वस्त्रे खरेदी कराल.
  • मिथुन:-
    बोलण्यातून मार्दवता दाखवाल. आवडीची कामे प्रथम कराल. घरातील कामे आनंदाने कराल. पारंपारिक कामात गढून जाल. कौटुंबिक खर्चाचा विचार करावा.
  • कर्क:-
    कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पार पाडाल. गप्पांमध्ये रंगून जाल. चमचमीत पदार्थ खाल. काही गोष्टी भडकपणे दर्शवू नका. हसत-हसत वेळ घालवावा.
  • सिंह:-
    चटकन मत दर्शवू नये. चैन करण्यावर भर द्याल. हातातील कामावर लक्ष द्यावे. कामाचा आवाका लक्षात घेवून वेळेचे नियोजन करावे. संयम राखावा लागेल.
  • कन्या:-
    कामात स्त्रियांची मदत मिळेल. मैत्रीतील आपुलकी वाढीस लागेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा. आधुनिकतेची आवड जोपासाल. कमी श्रमात कामे पार पडतील.
  • तुळ:-
    अपेक्षित लाभाने खुश असाल. मनातील अपेक्षा पूर्ण होतील. मैत्रीचे संबंध जपावेत. आलेल्या संधीचा लाभ घ्यावा. कामाला चांगली गती प्राप्त होईल.
  • वृश्चिक:-
    तुमची उर्जितावस्था वाढीस लागेल. सरकारी कामे वेळ घेतील. व्यावसायिकांनी अडचणींवर लक्ष द्यावे. निरपेक्ष मदतीचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल.
  • धनु:-
    दुखण्यांकडे दुर्लक्ष करु नका. मतवैचित्र्य दर्शवू नका. समजूतदारपणा दाखवावा लागेल. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. फार काळजी करू नये.
  • मकर:-
    चुकीच्या कल्पना बाजूला साराव्यात. काही कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठांशी मिळते-जुळते घ्यावे. एकमेकांतील आपुलकीची भावना वाढीस लागेल. भागीदारीत समाधानी राहाल.
  • कुंभ:-
    जोडीदाराची कमाई वाढेल. चुकीच्या संगतीत अडकू नका. एकमेकांवरील विश्वास महत्वाचा आहे. जोडीदाराचे वर्चस्व राहील. सामंज्यस्य दाखवावे लागेल.
  • मीन:-
    सहजपणे मिळणाऱ्या गोष्टींकडे लक्ष राहील. आवडते छंद जोपासायला वाव मिळेल. कामगारांवर लक्ष ठेवावे. मुलांच्या आनंदात रमून जाल. जुगाराची हौस पूर्ण कराल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader